मुंबई: प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढत चालली असून आता या प्रकरणात या विदेशी महिलेचं नाव पुढं आलं आहे. सुसान ही मेंटल थेअरपिस्ट असून तिनं दिलेल्या माहितीच्या आधारेच पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूबद्दल निष्कर्ष काढल्याचा आरोप भाजपनं केला आहे. वॉकर यांनी सुशांतच्या मानसिक स्थितीबाबत मीडियालाही वेगवेगळी माहिती दिली असून त्यांची पोलीस, सीबीआय व ईडी मार्फत चौकशी व्हायला हवी,’ अशी मागणी भाजपनं केली आहे.

भाजपचे आमदार अॅड. यांनी या संदर्भात एक व्हिडिओ ट्वीट केलं आहे. त्यातून त्यांनी सुसान वॉकर यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘सुशांतसिंहच्या आत्महत्येची पोलीस चौकशी योग्य दिशेनं चाललेली नाही असं आम्ही वारंवार म्हणतो आहोत. त्याला आता बळ मिळत आहे. मुंबई पोलिसांनी सुसान वॉकर नामक मनोविकारतज्ज्ञ महिलेनं दिलेल्या माहितीच्या आधारावर सुशांतनं आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला आहे. मात्र, त्यातून काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत,’ असं शेलार यांनी म्हटलं आहे.

वाचा:

‘मुळात सुसान वॉकर या एक विदेशी महिला आहेत. मनोविकारतज्ज्ञ म्हणून त्या भारतात व्यवसाय करतात. पण त्यांना भारतात व्यवसाय करण्याची परवानगी आहे का? तशी ती नसेल तर त्या व्यवसाय कशा करू शकतात? ज्या ठिकाणांहून त्या व्यवसाय करतात व कोट्यवधी रुपये कमावतात. त्यासाठी महापालिकेची व मुंबई पोलिसांची एनओसी त्यांनी घेतली आहे का आणि तसं नसेल तर सुसान वॉकर यांना बेकायदा व्यवसाय करण्याचं बळ राज्य सरकारमधील कोणी देतंय की बॉलिवूडमधील कलाकार देताहेत,’ असे प्रश्न शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

‘आमच्या माहितीनुसार सुसान वॉकर यांनी वृत्तवाहिन्यांना सुशांतच्या मानसिक अवस्थेची माहिती दिली होती. मेंटल अॅक्टनुसार अशी माहिती देता येत नाही. मग त्यांनी कायद्याचा भंग कसा केला? त्यांना यासाठी कोणाचं पाठबळ आहे? या सगळ्याची चौकशी होण्याची गरज आहे,’ अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here