कोल्हापूर:आपण अनेकदा आपल्या मित्रांना त्यांच्या नावावरुन चिडवत असतो. संपूर्ण नाव न उच्चारता ‘अव्या’, ‘रम्या’, ‘मन्या’, ‘सुन्या’, असा अपभ्रंश करुन मित्रांना हाक मारली जाते. थट्टा म्हणून हा प्रकार चालूनही जातो. मात्र, कोल्हापूरमध्ये अशाच मस्करीची कुस्करी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्या नावाचा एकेरी उल्लेख केला म्हणून मित्रानेच दुसऱ्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील माजगाव येथे घडली आहे. या प्रकरणी आता एका विरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मस्करीची कुस्करी झाली, हे वाक्य आपण अनेकदा ऐकत असतो. पण त्याचाच प्रत्यय कोल्हापूरमध्ये आला.

बायकोचा अंडा फ्राय बनवून देण्यास नकार; संतापलेल्या नवऱ्याने केलं असं काही…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी संभाजी चौगुले (वय ४२) आणि बळीराम केदारी कांबळे (वय ६३ ) हे दोघेजण माजगावचे असून, ऊसतोड मजूर असल्याने दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दरम्यान रात्री आठ वाजेच्या सुमारास फिर्यादी बळीराम कांबळे हा जेवण करून बाहेर फिरत होते. त्याचवेळी संशयित आरोपी संभाजी चौगुले हा रस्त्याने जाताना त्याला दिसला. दरम्यान ओळखीचा असल्याने फिर्यादीने त्यास ‘काय ए संभ्या’ अशी एकेरी हाक मारली. मात्र एकेरी हाक ऐकून संभाजी चौगुलेला राग आला आणि एकेरी हाक का मारली म्हणत फिर्यादी बळीराम कांबळे याच्या उजव्या डोळ्याखाली हातातील खुरप्याने वार केला यामध्ये बळीराम कांबळे जखमी झाले. खुरप्याने वार केल्याने बळीरामच्या डोळ्याखालच्या भागातून रक्त येऊ लागले. दरम्यान तात्काळ रुग्णालयात जात उपचार घेण्यात आले. दरम्यान आता या प्रकरणी संभाजी चौगुले विरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीसांनी तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here