मुंबई :जागतिक आर्थिक संकट आणि महागाईच्या या काळात जगभरातील केंद्रीय बँका सोन्याची प्रचंड खरेदी करताना दिसतात. त्यामुळे सोने खरेदी करण्यात श्रीमंतही मागे नाहीत. देशातील श्रीमंतांना सोन्यात गुंतवणूक करण्याची आवड आहे. आजकाल श्रीमंत लोक त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा सोने खरेदीत गुंतवत आहेत. एका अहवालानुसार, २०१८ मध्ये अल्ट्रा-हाय नेटवर्थ संपत्ती असलेल्या भारतीयांनी त्यांच्या संपत्तीपैकी केवळ ४% सोन्यात गुंतवणूक केली होती, जी २०२२ मध्ये ६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

नाईट फ्रँकचा सर्व्हे
रिअल इस्टेट सल्लागार नाईट फ्रँक यांनी सर्व्हे केला आहे. यानुसार भारतातील श्रीमंत लोक त्यांच्या संपत्तीपैकी ६% रक्कम सोन्यात गुंतवत आहेत. अहवालानुसार, चीनमधील अति-उच्च नेटवर्थ लोक त्यांच्या संपत्तीपैकी ६ टक्के सोने खरेदीवर खर्च करत आहेत. ऑस्ट्रियातील श्रीमंत लोक सोन्याच्या खरेदीवर जगात सर्वाधिक खर्च करतात. या सर्वेक्षणानुसार ऑस्ट्रियातील अतिश्रीमंत लोक त्यांच्या संपत्तीपैकी ८ टक्के रक्कम सोन्यात गुंतवत आहेत.

तुम्हाला करोडपती व्हायचं आहे का?, मग ही युक्ती समजून घ्या, रोज वाचवा फक्त ५० रुपये
सोन्याचे भाव वाढले
अलीकडच्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे श्रीमंतांनी त्यांच्या गुंतवणुकीचा मोठा भाग सोन्यात गुंतवला आहे. पाच वर्षात सोन्याच्या किमतीत जवळपास १०० टक्के वाढ झाली आहे. एप्रिल २०१८ मध्ये सोन्याचा दर ३१,५०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर होता, जो आता ६०,६०० रुपयांच्या आसपास आहे. म्हणजे या काळात किमती ९२% वाढल्या आहेत. अहवालानुसार, करोना महामारी, कमी व्याजदर आणि रोख सहज उपलब्ध करून देण्याच्या जागतिक मध्यवर्ती बँकांच्या धोरणामुळे सोन्याचे भाव वाढले आहेत. अमेरिका, दक्षिण कोरिया, इटली आणि आयर्लंडसारख्या देशांतील श्रीमंतांनी २०२२ मध्ये त्यांच्या संपत्तीपैकी एक टक्का सोन्यात गुंतवणूक केली होती. तर ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियातील दोन टक्के लोकांनी सोन्यात गुंतवणूक केली आहे.

जागतिक मंदीच्या काळातही Google CEOवर पैशाचा पाऊस, पगारही कर्मचाऱ्याच्या ८०० पट
आरबीआयकडूनही सोने खरेदी

ही बाब श्रीमंतांची आहे. पण सोने खरेदी करण्यात आरबीआयही मागे नाही. आरबीआयकडे सोन्याचा साठा ७९०.२ टन इतका वाढला, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, आरबीआयच्या या खरेदीनंतर जगातील ८ टक्के सोन्याचा साठा आता भारताकडे आहे. २०२२ च्या पहिल्या तिमाहीत भारताकडे एकूण ७६०.४२ टन सोन्याचा साठा होता, जो २०२२ च्या चौथ्या तिमाहीअखेर ७८७.४० टनांवर पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात आरबीआयने जवळपास ३० टन सोने खरेदी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here