ॲपल स्टोअरमधील कर्मचाऱ्यांचा पगार आणि पात्रता
मुंबई आणि दिल्ली येतील दोन स्टोअर हाताळण्यासाठी कंपनीने तब्बल १७० कर्मचारी नियुक्त केले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की त्यांच्यापैकी बहुतेकांकडे उच्च-पात्रता असून काहींकडे तर केंब्रिज आणि ग्रिफिथ सारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून पदवी देखील आहे. भारतातील दोन्ही ॲपल स्टोअर्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एमटेक, एमबीए, बीटेक, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, पॅकेजिंग, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन इंजिनिअरिंग यासारखे पदवी शिक्षण घेतले आहे.
जगभरातील प्रीमियम अनुभव प्रदान करणे ही ॲपलची ओळख असून हे त्यांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत देखील दिसून येते. कंपनीच्या मुंबई स्टोअर Apple BKC मध्ये ग्राहकांसाठी २५ वेगवेगळ्या भाषांमध्ये सेवा उपलब्ध आहे, तर Apple Saket मध्ये कंपनीने १५ भाषा जाणणारे कर्मचारी नियुक्त केले आहेत. म्हणजेच या स्टोअर्समध्ये कंपनीच्या ग्राहकांना ग्लोबल कस्टमर एक्सपिरियन्स मिळणार आहे. तसेच युरोप आणि मध्यपूर्वेतील ॲपल स्टोअर्समधून काही परदेशी भारतीयांची बदली करण्यात आली असून, या सर्व कर्मचाऱ्यांना रिटेलचा अनुभव आहे, असे ET ने आपल्या अहवालात म्हटले.
पगार जाणून थक्क व्हाल
जे कर्मचारी इतके उच्च शिक्षित आहेत, मग त्यांचा पगार किती असेल याबाबत नक्कीच तुमच्या मनात उत्सुकता असेल. ॲपल स्टोअरमध्ये काम करणार्या कर्मचार्यांचा पगार सामान्य इलेक्ट्रॉनिक स्टोअरमध्ये काम करणार्या सामानाच्या ३-४ पट जास्त आहे. अशी उच्च पात्रता असलेले कर्मचारी रिटेल स्टोअरमध्ये नोकरी करतात अशा स्थिती त्यांचा पगारही विशेष असेल हे स्पष्ट आहे. ईटीच्या अहवालानुसार इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे.
कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा
ॲपल हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे, त्यामुळे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना विशेष सुविधाही देते. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य लाभ, वैद्यकीय योजना, पगारी रजा, शैक्षणिक अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क आदी सुविधा मिळतात. त्याचबरोबर ॲपलची उत्पादने खरेदी करण्यावरही सूट देण्यात मिळते.
आयफोन अवाक्यात! अँड्रोइडपेक्षाही होणार स्वस्त