आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही मोजके फलंदाज आहेत ज्यांना ३६० डिग्री शॉट खेळता येतात. एबी डिविलियर्सच्या निवृत्तीनंतर जोस बटलर, सूर्यकुमार यादव, ग्लेन मॅक्सवेल हे खेळाडू असे शॉट खेळतात. मात्र कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या अजिंक्यने एकापाठोपाठ एक असे अनेक शॉट खेळले ज्याची अपेक्षा टेस्ट स्पेशलिस्टकडून कोणीच केली नव्हती.
केकेआरविरुद्ध उमेश यादवच्या एका चेंडूवर ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन विकेटकीपरच्या डोक्यावरून अजिंक्यने षटकार मारला. तर कुलवंत खिजरोलियाच्या चेंडूवर त्याने शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मारला. अजिंक्यने २९ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. या खेळीत त्याचा स्ट्राइक रेट २००पेक्षा जास्त होता. आयपीएलच्या करिअरमध्ये ही दुसरी वेळ आहे जेव्हा अजिंक्यचा स्ट्राइक रेट २०० पेक्षा जास्त गेला असेल आणि विशेष म्हणजे दोन्ही खेळी याच हंगामात झाल्या आहेत.
आयपीएल २०२३ मध्ये सुरुवातीच्या २ सामन्यात अजिंक्यला संधी दिली नाही. मोईन अली आजारी पडला आणि मुंबई इंडियन्स विरुद्धच्या लढतीत अजिंक्यला अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले. या मॅचमध्ये त्याने १९ चेंडूत अर्धशतक केले. आतापर्यंत ५ मॅचमध्ये ५२.२५च्या सरासरीने त्याने २०९ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १९९.०५ इतका आहे जो अन्य सर्व फलंदाजांपेक्षा जास्त आहे.
अजिंक्यच्या या धमाकेदार फॉर्ममुळे आता अशी चर्चा सुरू झाली आहे की, त्याच्यामुळे भारतीय संघातील सूर्यकुमार यादवचे स्थान धोक्यात येईल की काय. कसोटीपटू अशी ओळख असलेला अजिंक्य सूर्या प्रमाणे ३६० डीग्री शॉट मारतो आणि गोलंदाज त्याला चेंडू टाकण्यापासून घाबरताना दिसत आहेत.
क्रिस गेलला एअरपोर्टवर पाहाताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड