नवी दिल्ली :बॉलीवूडचा ‘भाईजान’ सलमान खानचा ‘किसी का भाई, किसी की जान’ या चित्रपटाने सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. ईदच्या निमीत्त रिलीज झालेल्या या चित्रपटाचे चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमानच्या चाहत्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. आणि आता या यादीत भारतीय रेल्वेच्या नावाचाही समावेश झाला आहे. भारतीय रेल्वेने फिल्मी शैलीत महत्त्वाची माहिती आपल्या प्रवाशांसोबत शेअर केली आहे. सलमान खानच्या ‘किसी का भाई, किसी की जान’ या चित्रपटाच्या शीर्षकासह, पश्चिम रेल्वेने लोकांना सर्जनशीलपणे सांगितले आहे की ते दुसऱ्याच्या कन्फर्म तिकिटावर कसे प्रवास करू शकतात.

खूशखबर! मुंबई-नागपूर दरम्यान धावणार १० ‘स्पेशल ट्रेन’; जाणून घ्या कुठे घेणार स्टॉप…
कोणाचं तिकीट, कोणाचा प्रवास
तुम्ही तुमचे कन्फर्म रेल्वे तिकीट दुसऱ्याच्या नावे ट्रान्सफर करू शकतात. म्हणजे तुमच्या कन्फर्म तिकिटावर इतर व्यक्ती सहज प्रवास करू शकतो. रेल्वेने ट्विट करून आपली पद्धत स्पष्ट केली आहे. तिकीट हस्तांतरित करण्याच्या पद्धत स्पष्ट करताना रेल्वेने म्हटले की लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर तिकीट हस्तांतरित (ट्रान्सफर) करू शकतात. जर तुमच्याकडे कन्फर्म तिकीट असेल आणि तुम्ही प्रवास करू शकत नसाल तर तुम्ही ते तिकीट तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर ट्रान्सफर करू शकता.

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! उद्यापासून गोरखपूरसाठी धावणार समर स्पेशल ट्रेन; जाणून घ्या वेळापत्रक…
रेल्वे तिकीट ट्रान्सफर कसे करायचे?
तुम्ही तुमचे तिकीट तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे ट्रान्सफर करू शकता. मात्र, सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमचे तिकीट कन्फर्म असले पाहिजे. तुम्ही वेटिंग किंवा RC तिकिट ट्रान्सफर करू शकत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य जसे की पालक, भावंड, जोडीदार आणि मुलगा किंवा मुलगी यांच्या नावावर हस्तांतरण करू शकता. म्हणजेच ज्यांच्याशी तुमचे रक्ताचे नाते आहे, त्यांना तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट ट्रान्सफर करू शकता.

चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोलीच्या दोन लोकल फेऱ्या रद्द, कारण…
यासाठी तुम्हाला प्रवासाच्या २४ तासपूर्वी विनंती करावी लागेल. तिकीट हस्तांतरणाची पद्धत अतिशय सोपी आहे. स्टेप्स फॉलो करून तिकीट हस्तांतरित करा…

  • प्रथम तिकिटाची प्रिंट काढा.
  • आता आरक्षण काउंटरवर जा, जे जवळच्या रेल्वे स्टेशनवर आहेत.
  • इथे तुम्हाला ज्या व्यक्तीच्या नावाने तिकीट ट्रान्सफर करायचे आहे त्याचे आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र सबमिट करा.
  • आता तुम्ही काउंटरवरून तिकीट ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज देऊ शकता.

राजधानी, दुरंतोलाही टक्कर, कमी पैशात वेगवान प्रवास, वंदे भारतने रेल्वेचा चेहरा बदलून टाकला

अखेरीस पडताळणीनंतर तुमचे तिकीट तुमच्या नातेवाईकाच्या नावावर ट्रान्सफर केले जाईल, अशा प्रकारे दुसरी व्यक्ती तुमच्या तिकिटावर प्रवास करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here