मध्य प्रदेशःमहिलेने तिच्या अल्पवयीन मुलीचं लग्न ठरवलं, लग्नाचा मांडवही पडला मात्र अचानत पोलिस आले अन् महिलेने जे केलं ते पाहून उपस्थित सर्व वऱ्हाडीही गोंधळले. मध्य प्रदेशातील मालवा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.महिलेने तिच्या भावाच्या मदतीने अल्पवयीन मुलीचे लग्न ठरवले. मात्र, पतीला मात्र हे लग्न मान्य नव्हते त्याने पोलिसांत पत्नीच्या कारनाम्याची तक्रार दिली. मुलीचा जबरदस्ती बालविवाह करुन दिला जात असल्याचं तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने पावलं उचलत विवाह स्थळ गाठलं. तेव्हा तिथे मुलीच्या लग्नाची तयारी केली जात होती.

पोलिसांनी मांडवात येऊन चौकशी सुरु केली. पोलिसांचा तपास भटकवण्यासाठी आईने शक्कल लढवली. पोलिस चौकशी करत असताना तिने मुलीला लपवून ठेवले व स्वतःचं नववधूसारखी तयार होऊन मुलीच्या जागी जाऊन बसली. पोलिस तिची चौकशी करु लागल्यावर ती सातत्याने त्यांची दिशाभूल करु लागली. मात्र, पतीने तिची सारी पोल खोलल्यानंतर तिने अखेर सत्य कबुल केलं.

प्रवाशांचा प्रवास जलद होणार; दहिसर-मिरा मेट्रो मार्गिका उत्तनपर्यंत नेणार, पण अद्याप…
या सगळ्या नाट्यानंतर महिलेला पोलिस ठाण्यात नेण्यात आलं व अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबण्यात आला. या सगळ्या प्रकरणात महिलेला साथ देणारा तिचा भाऊ म्हणजेच मुलीच्या मामालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या प्रकरणात कोण कोण सामील होतं याची चौकशी पोलिस करत असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, एका पित्यामुळं अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आल्याने जिल्ह्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, पोलिसांनीही नागरिकांना मुलींचा बालविवाह न लावून देण्याचं आवाहन केलं आहे. व तुमच्या अवती-भवती अशा प्रकारचा गुन्हा घडत असल्यास पोलिसांना तातडीने संपर्क करा, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

नामीबियातून भारतात आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू, महिनाभरात दुसरी घटना, कारण अस्पष्ट

लग्न, रिसेप्शनसाठी लागणाऱ्या महागड्या साड्या स्वस्तात | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here