डोंबिवली :डोंबिवली जवळील कोळे गावात एका महिलेने आपल्या नव्या प्रियकराच्या मदतीने लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.मारुती लक्ष्मण हांडे (वय ५५ वर्ष), याचे संध्या सिंग (वय ३०) नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या वर्षाभरापासून मारुती आणि संध्या डोंबिवली जवळील कोळेगांव येथील एका चाळीत लिव्ह इन रिलेनशिपमध्ये एकत्र राहत होते. दरम्यान संध्या सिंग हिचे सदर भागात राहणारा वेदांत उर्फ गुड्डु शेट्टी (वय २२) याच्या सोबत प्रेमसंबंध जुळले. त्यातूनच त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

ही बाब मारुती हांडे यास माहिती झाली आणि त्याचे संध्या सिंगसोबत वाद होऊ लागले. मारुतीने अनेक वेळा संध्याला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु वेदांत शेट्टीसोबत तिचे प्रेमसंबंध सुरुच राहिले होते. मारुती हांडेचे संध्यासोबत वाद वाढू लागले. अखेर दोघांमधील काटा दूर करण्यासाठी संध्या सिंग व वेदांत शेट्टी यांनी मारुती हांडे यास जीवे ठार मारण्याचा प्लान केला.

२२ एप्रिल रोजी मारुती हांडे दुपारी घरात जात असताना वेदांत शेट्टीने स्टम्पने त्याच्या डोक्यात, हातावर, पायावर मारहाण केली. त्यावेळी संध्या सिंगने मारुती हांडेला मारण्यासाठी प्रोत्साहन दिले. वेदांत शेट्टीने मारुती हांडेंच्या डोक्यात जोरात उपट घालून त्यास गंभीर जखमी केले, त्यानंतर संध्या सिंगने वेदांतच्या मदतीने मारुती हांडे यांना ज्ञानदेव मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल, कोळेगांव येथे उपचारसाठी दाखल केले त्यावेळी त्यास कोणी मारले याबाबत वैद्यकीय अधिकारी यांना काहीही माहिती दिली नाही.

मारुती हांडे यांना झालेल्या जखमा गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे पाठविण्यात आले, त्यावेळी संध्या सिंगने मारुती हांडेंच्या पत्नीला फोन करुन मारुती हांडे यास कोणीतरी मारहाण केली असून, त्यास कळवा येथे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती देऊन सदर ठिकाणी बोलावून घेतले. त्यावेळी मारुती हांडे यांची पत्नी, मुलगा व भाऊ असे हॉस्पिटलमध्ये आले असता, संध्या सिंग हिने मारुती हांडे यास कोणी मारले याची काही माहिती न देता जखमीचे केस पेपर मारुती हांडे याच्या पत्नीकडे देऊन हॉस्पिटलमधून गपचूप निघून गेली.

लॉजसमोर झोपलेल्या रिक्षा चालकाचा खून, भररस्त्यात दगडाने ठेचलं, कारण समजताच पोलीस हादरले
दरम्यान जखमी मारुती हांडे यास झालेल्या जखमा गंभीर असल्याने, त्यास पुढील उपचारासाठी सर जे. जे. रुग्णालय, मुंबई येथे पाठविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असताना २३ एप्रिल रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मानपाडा पोलीस यांना मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त, सुनिल कुराडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या ३ टिम तयार केल्या आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार, सपोनि. सुरेश डांबरे, सपोनि.अविनाश वनवे, सपोनि.सुनिल तारमळे आणि इतर पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

संध्या सिंग व वेदांत शेट्टी यांच्या पत्त्यावर शोध घेतला असता ते त्यांच्या घरी सापडले नाहीत. सदर आरोपींचा वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेण्यात आला असून त्यांचा कोणताही सुगावा नसताना त्यांना अथक प्रयत्नांनी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सदर आरोपींनी मारुती हांडे हा प्रेमसंबधात अडथळा निर्माण करीत असल्याने त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आज त्यांना कोर्टात हजर केले जाईल असे पोलिसांनी सांगितले.

अजिंक्य अजून कसा खाली आला नाही? घरचे खोलीत गेले, तिथे तरुणाने बेडशीटनेच स्वतःला संपवलेलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here