अकोला :अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाचे दर स्थिरावले आहेत. या बाजार समितीत ८ एप्रिल रोजी कापसाला जास्तीत जास्त ८ हजार ८४० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव होता. त्यानंतर कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत गेली. तेव्हापासून आतापर्यत २९५ रूपयांनी दर खाली असून आज सोमवारी (२४ एप्रिल) कापसाला ८ हजार पासून ८ हजार ५४५ रूपयांपर्यत भाव मिळाला. कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या हंगामात अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी बाजारात शेतकऱ्यांना कापसाला उच्चांकी तेरा हजारांवर प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. मात्र यावर्षी दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

या एप्रिल महिन्यात साधारणता ८ एप्रिल रोजी कापसाला ८ हजार २०० ते ८ हजार ८४० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. मात्र, सद्यस्थितीत तेव्हापासून कापसाचे दर सातत्यानं खाली उतरले आहेत. शनिवारी (१५ एप्रिल) रोजी ८ हजार ११५ पासून ८ हजार ७५५ रूपये प्रतिक्विंटल असा भाव होता. आता १९ एप्रिलला ८ हजार पासून ८ हजार ६३० रूपये, अन् २० एप्रिल रोजी किंचित दरात वाढ झाल्याने कापसाला ८ हजार पासून ८ हजार ६४५ रूपये प्रति क्विंटल मागे भाव मिळाला.

काही दिवसांत लेकीचं लग्न, पत्रिका वाटण्यासाठी आई-वडील दोघे निघाले; मात्र वाटेतच…

आज सोमवारी कापसाच्या दरात मोठी घसरण झाली असून ८ हजार ते ८ हजार ५४५ रूपये क्विंटलवर आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. बाजारात आवक वाढली असून आज ३ हजार २०० क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. दरम्यान सद्यस्थितीत दरवाढीची शक्यता नसल्याचे संकेत आहेत. काहींच्या माहितीनुसार ‘एप्रिल’च्या अखेर अथवा ‘मे’ महिन्यात कापसाचे दर वाढू शकतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

बाप हा बापच असतो… लाडक्या साराने सचिनला दिल्या सुंदर शुभेच्छा, पोस्ट पाहून इमोशनल व्हाल…

यंदाच्यावर्षी कापसाचं पीक चांगलं आलं आहे. परंतु, दर मिळत नसल्यामुळे नेमकं काय करावं अशी स्थिती आमच्यासमोर आहे. अजूनही योग्य भाव मिळत नसल्यानं ३० क्विंटल कापूस घरात पडून आहे. एप्रिलच्या अखेर कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेने कापूस विक्री थांबवू, जर दर वाढले नाहीत तर मिळेल त्या भावात कापूस विकावा लागेल. कारण खरीप हंगाम जवळ येतोय, त्यासाठी लागणारा पेरणी खर्च म्हणजे बी-बियाणे अन् तसेच करार शेतीही करतोय, त्यामुळं शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागतात. आता अपेक्षेनुसार कापसाला भाव नसल्याने कापूस पिकाला फाटा देत दुसऱ्या पिकाकडे वळावं लागेल हाच एक पर्याय आमच्यासमोर उरला आहे. अशी प्रतिक्रिया अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख येथील शेतकरी सचिन वैतकार यांनी व्यक्त केली आहे.

तोपर्यंत सरकारी दस्तावेजांवर औरंगाबादचं नाव बदलू नका; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here