नंदुरबार: महिला वाहतूक पोलीस आणि शहरातील एका राजकीय व्यक्तीचा पुत्र यांच्यात भर रस्त्यावर शाब्दिक बाचाबाची होऊन युवकाने शिवीगाळ करत वाहतूक महिला पोलिसाला धक्काबुक्की केल्याची संतापजनक घटना घडली आहे. युवकाने महिलेवर हाथ उचलल्याने घटनास्थळी असलेल्या काहींनी त्या युवकाला मारहाण केली. त्यावेळी त्याने तेथून पळ काढला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. नंदुरबार शहरातील अंधारे चौकातील रस्त्यातील दुभाजकाजवळ वाहतूक नियंत्रण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा हा प्रकार शनिवारी दुपारच्या वेळी घडला होता. या प्रकरणी त्या दोघा भावांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिनने अंजलीकडून अंगठी घालण्यास का दिला होता नकार, साखरपुड्यात असं काय घडलं होतं…
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २२ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास एक महिला पोलीस कर्मचारी शहरातील अंधारे चौक परिसरात वाहतूक नियंत्रणाचे काम करत आपले कर्तव्य बजावत होत्या. यावेळी सरोज परवेज खान याने शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याजवळ जाऊन अश्लिल शिवीगाळ केली. तसेच सदर महिला पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर ओढून मारहाण केली. या मारहाणीत सदर महिला कर्मचाऱ्याच्या खांदे, डोके आणि पोटाला दुखापत झाली आहे.

यादरम्यान सरोज खान याचा मोठा भाऊ सरजील परवेज खान याने देखील महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. यादरम्यान घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी दोघा भावांना मारहाण केल्यानंतर दोघांनी दुचाकीवरुन पळ काढला. मात्र, यावेळी दोघांनी सदर महिला पोलीस कर्मचाऱ्याला जिवेठार मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

सोशल मीडियावर या घटनेप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. या प्रकरणी रात्री उशिराने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरुन संशयित सरोज परवेज खान आणि सरजील परवेज खान या दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादंवि कलम ३५३, ३५४, ५०९, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील करत आहेत.

तोपर्यंत सरकारी दस्तावेजांवर औरंगाबादचं नाव बदलू नका; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here