Maharashtra Bhushan : भाजप आणि एकनाथ शिंदे यांना मतदान करू नका, असं महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे आवाहन करणारे खोटे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते

 

Appasaheb Dharmadhikari Viral Photo
आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावे बनावट पत्र व्हायरल
रायगड/अलिबाग: श्री सदस्यांचे श्रद्धास्थान असलेल्या अलिबाग रेवदंडा येथील आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी एका शुभम काळे नामक व्यक्तीला रायगड क्राईम ब्रांचच्या पथकाने पुणे येथून अटक केली आहे. अलिबाग कोर्टाने या संशयित आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. त्यामुळे आता एक खोटे पत्र सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असं महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावे आवाहन करणारे खोटे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शनिवारी २२ एप्रिल रोजी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे हे पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले. अनेकांकडून हे पत्र व्हॉट्सअप-फेसबुक द्वारा व्हायरल करण्यात येत होतं.

जेवून घ्या रे, महाराष्ट्र भूषण सोहळ्यातून आईचा फोन; लेकरं शोधत राहिली, माऊली परतलीच नाही
या प्रकरणी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम 500, 501, 505 (2), 505 (3) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे 66 सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लोकांना पाणी मिळत नव्हतं अन् तुम्ही शामियानात शाही मेजवान्या झोडल्या?; संजय राऊतांचा सवाल

हे प्रकरण रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दयानंद गावडे शीघ्र गतीने सुरू केला होता. या पथकाने पुणे येथून सदर तरुणाला अटक करण्यात आली आहे. आज त्याला अलिबाग न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता रायगड पोलीस सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे
खारघरहून येताना मीनाक्षीताईंचा हात सुटला, अन् डोळ्यादेखत…मैत्रिणीने सांगितला भयावह अनुभव

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here