छत्रपती संभाजीनगर: लग्नाचं आमिष दाखवून पीडितेवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याप्रकरणी जामिनावर सुटला. त्यानंतर एका राजकीय पक्षाच्या नेत्याने त्याच पिडितेला दोन मिनिटं भेटण्याच्या बहाण्याने बोलावून चारचाकी वाहनात बसून बेदम मारहाण केली. “माझ्यासोबत शरीर संबंध न ठेवल्यास चाकूने भोसकून मारून” टाकण्याची धमकीही दिली. ही घटना २२ एप्रिल रोजी मिलिंद महाविद्यालय जवळील मोरे चौकात घडली. या प्रकरणी आरोपी विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयकिशन कांबळे (रा. संघर्ष नगर मुकुंदवाड) असं आरोपीचे नाव असून या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय किशन कांबळे हा एका राजकीय पक्षाचा नेता होता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याची राजकीय पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी तो जेलमध्ये होता.

भेंडवळच्या घट मांडणीला शास्त्रीय आधार नाही, विश्वास ठेवू नका,ही निव्वळ… म्हणत अंनिसचं शेतकऱ्यांना आवाहन
मात्र, त्याचा जामीन झाल्यामुळे तो बाहेर आला. दरम्यान, २२ एप्रिल जय किशन कांबळे याने पीडित महिलेला फोन करून दोन मिनिटं भेटण्यासाठी बोलावलं. पीडित महिला तिच्या मामाच्या मुलीसोबत आरोपीला भेटण्यासाठी गेली. यावेळी आरोपीने महिलेला बळजबरीने कारमध्ये बसण्यासाठी सांगितलं. महिला कारमध्ये बसल्यानंतर तिला बेदम मारहाण केली. “तू माझ्यासोबत संबंध ठेव, तू मला हवी आहे, तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर तुला चाकूने भोसकून मारून टाकीन”, अशी धमकी देखील आरोपीने पीडितेला दिली. त्यानंतर पीडित महिला डी मार्ट येथे गेली असता तिला येण्यास उशीर झाला यावेळी “तुला येण्यास उशीर का झाला” असं म्हणून त्याने तिला परत बेदम मारहाण केली.

दरम्यान, आरोपी हा बाबा पेट्रोल पंप परिसरामध्ये वाईन शॉपवर दारू घेण्यासाठी थांबला असता पीडितेने संधीचा फायदा घेऊन तात्काळ गाडीतून उतरत रिक्षा पकडून घराकडे धाव घेतली. ही बाब आपल्या आईला सांगितल्यानंतर आईसह तिने छावणी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत तात्काळ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावे बनावट पत्र व्हायरल, पुण्यातील तरुणाला अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here