लखनौ :उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्याचे उपमुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) सोमवारी सकाळी शहरातील हॉटेल विठ्ठलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. अधिकाऱ्याच्या पत्नीने फोन करुन आपले पती फोन उचलत नसल्याचं कर्मचाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर हॉटेल कर्मचार्‍याने जाऊन खोलीचा दरवाजा ठोठावला. परंतु उत्तर न मिळाल्याने दार तोडल्यानंतर डेप्युटी सीएमओ सुनील कुमार सिंह यांचा मृतदेह फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून तपास सुरू आहे. ५१ वर्षीय सुनील कुमार हे मूळ वाराणसीचे रहिवासी होते. ते प्रयागराजमधील लसीकरण मोहिमेचे निरीक्षण करण्यासाठी आले होते.

पोलिस उपायुक्त दीपक भुकर यांनी पत्रकारांना सांगितले की, सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली, की डॉ सुनील कुमार सिंह त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडत नाहीयेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला तेव्हा त्यांना डॉ. सुनील हे पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसले.

अक्षय्य तृतीयेनिमित्त देवळात निघाले, वाटेत खजिनदाराचा मृत्यू, एसटीच्या बंपरखाली अडकून पडले
प्राथमिक दृष्टया ही आत्महत्या असल्याचे दिसते. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरु असल्याचे भुकर यांनी सांगितले.

मित्र-मैत्रिण फिरण्यासाठी गेले, रस्त्यातच नराधमांनी अडवलं, एकाने छेड काढली, दुसऱ्याने गोळी घातली

मयत डॉ सुनील यांचा ड्रायव्हर सतीश सिंगने सांगितले की, त्यांना बेली हॉस्पिटलमध्ये नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी रविवारी संध्याकाळी हॉटेलमध्ये चेक इन केले. डॉ. सुनील वाराणसी येथील त्यांच्या घरुन ड्युटीवर येत असत. सकाळी डॉक्टरांच्या पत्नीचा फोन आला. आपले पती फोन घेत नसल्यामुळे त्यांनी बघून येण्यास सांगितले. मी सकाळी साडेनऊच्या सुमारास डॉ. सुनील यांच्या खोलीजवळ गेलो. अनेक वेळा दार ठोठावले, पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना बोलावले. अखेर पोलिसांना बोलावले असता दार तोडल्यानंतर डॉक्टर मृतावस्थेत आढळल्याचे ड्रायव्हरने सांगितले.

अजिंक्य अजून कसा खाली आला नाही? घरचे खोलीत गेले, तिथे तरुणाने बेडशीटनेच स्वतःला संपवलेलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here