नाशिक:अक्षय्य तृतीया आणि रमजान ईदचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे झाले. परंतु या काळात अनेक दुर्दैवी घटना देखील घडल्या. अक्षय्य तृतीया साजरी करून पुणे येथे बहिणीकडे घरभरणीसाठी जाणाऱ्या नाशिकच्या सटाणा येथील डोंगरे परिवाराच्या वाहनाचा सिन्नर-संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात ३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.गाडी दुभाजकाला धडकली, तीन वेळा पलटली

सटाणा येथील रहिवासी असलेले मिथून उर्फ पप्पू डोंगरे हे शनिवारी आई, पत्नी, दोन्ही मुलांसह आपल्या चार चाकी वाहनातून पुण्याला बहिणीकडे गुण्या गोविंदाने निघाले. पण, वाटेत डोंगरी कुटुंबीयांसोबत नियतीने घात केला. त्यांनी पुण्याला जाण्यासाठी सिन्नर-संगमनेर मार्गे जाण्याचे ठरवले. याच, दरम्यान सिन्नर-संगमनेर मार्गाजवळ आले असताना त्यांचे वाहन दुभाजकाला धडकले. यात त्यांचे चार चाकी वाहन दोन ते तीन वेळा उलटले. या भीषण अपघातात वाहनातील डोंगरे कुटुंब जखमी झाले. दुर्दैवानं डोंगरे कुटुंबातील तीन वर्षीय मुलगा श्रीयांश याचा मृत्यू झाला. पप्पू डोंगरे यांच्या पत्नीच्या एका हाताला गंभीर दुखापत झाली, तर आईच्या कमरेला जबर मार बसला. पप्पू डोंगरे आणि त्यांचा मोठा मुलगा या अपघातात किरकोळ जखमी झाले. वाहनाच्या चालकालाही दुखापत झाली.

२००० वर्ष जुना खजिना सापडला, जमिनीत पुरलेला होता, पाहून पुरातत्त्वशास्त्रज्ञ भलतेच खूश
आईवडिलांच्या डोळ्यांदेखत तीन वर्षीय श्रीयांशचा मृत्यू

दरम्यान, डोंगरे कुटुंबीयांच्या वाहनाचा अपघात होताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या दिशेने तात्काळ धाव घेतली आणि मदत कार्य करत डोंगरे कुटुंबीयांना संगमनेर येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर जखमी झालेल्या डोंगरे परिवाराला नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात तीन वर्षीय श्रीयांशचा त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यादेखतच मृत्यू झाला. सटाणा येथील अमरधाममध्ये श्रीयांशवर मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिर्डीला निघालेल्या ठाण्यातील भक्तांच्या बसला ट्रकची धडक; दहा प्रवाशांचा मृत्यू

२४ डोळे, हार्ट अटॅक आणणारं विष… एका इंचाच्या या प्राण्याने शास्त्रज्ञांची झोप उडवली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here