नाशिकःजिल्ह्यात अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा येथे अल्टोकार, पिकअप व मोटरसायकल या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे.या तिहेरी अपघात अल्टो कार मधील इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रामदास माधव शिंदे (रा. रवळस ता. निफाड) असे अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रामदास शिंदे हे प्राध्यापक असून उद्या त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होणार होता.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवार (दि.२४) रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास रामदास शिंदे हे नाशिकहून वणी येथे अल्टोकार (एमएच १५ सीएम ४४७४) ने जात होते.त्यावेळी वणीहून दिंडोरीकडे जाणारी पिकअप वाहन क्रमांक (एमएच १५ ईजी ५८३०) ही अल्टोकारला धडकली. त्याचवेळी पाठीमागून येणारी मोटरसायकल स्प्लेंडर प्रो (एमएच १५ डीएच ४९३१) ही देखील पिकअप आणि अल्टोकारला धडकली. त्यामुळे तिहेरी अपघात झाला. या अपघातात रामदास शिंदे हे जागीच ठार झाले. तर मोटारसायकल चालक विठ्ठल पंढरीनाथ पागे (आंबेवणी) हे गंभीर जखमी झाले.

सोलापूर, उस्मानाबाद, लातूरकरांना मोठा दिलासा; पुणे-लातूर-पुणे रेल्वे सेवा सुरू होणार
रामदास शिंदे हे वणी येथील ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. शिंदे यांचा उद्या मंगळवार दिनांक २५ रोजी वणी येथे रिटायरमेंटचा कार्यक्रम होता. मात्र, त्याआधीच त्यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले. प्राध्यापक म्हणून सेवा बजविल्यानंतर त्यांचा उद्या सेवानिवृत्तची कार्यक्रम होणार होता त्यामुळे शिंदे कुटुंबीय मोठ्या आनंदात होते. परंतु रामदास शिंदे यांच्यावर काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रिफायनरी सर्वेक्षण: मला हॉस्पिटलला जायचं नाही, जे व्हायचं ते इथेच होऊ दे; ती महिला चक्कर आल्यानंतरही हटली नाही
शिक्षक वर्गावर शोककळा

रामदास शिंदे यांच्या दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या कुटुंबात मित्र परिवारात शिक्षक वर्गावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाता प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार टी. बी. जाधव, पोलीस नाईक एस. के. कडाळे करत आहेत.

तोपर्यंत सरकारी दस्तावेजांवर औरंगाबादचं नाव बदलू नका; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here