विमानावर किती इंधन आहे. त्याच्या कुठच्या इंजिनला राईटच्या इंजिनला किंवा लेफ्टच्या इंजिन आहे. बोईंग आहे की एअरबस आहे. आता जवळच्या विमानतळावर विमानाचं लँडिंग करावं लागेल, असं नितीन जाधव म्हणाले.
नेपाळच्या काठमांडू विमानतळावरुन उड्डाण घेतलेल्या फ्लाय विमानात १२० प्रवासी आहेत. फ्लाय दुबई विमानानं उड्डाण केलं त्यानंतर लगेच आग लागली आहे. हे विमान काठमांडूमध्ये हवेत घिरट्या घालत आहे. विमान लँड करण्यासंदर्भातील प्रयत्न सुरु आहेत. विमान सध्या हवेत घिरट्या घालत असून काठमांडू विमानतळावर विमानाचं लँडिंग करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, नेपाळच्या सरकारनं दिलेल्या माहितीनुसार विमान काठमांडूच्या दिशेन रवाना झालं आहे.
नेपाळच्या नागरिकांसह परदेशी नागरिक विमानात
नेपाळच्या पत्रकारांनी विमानाला आग लागल्यासंदर्भातील व्हिडिओ पोस्ट केला आहे. विमान वाहतूक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जवळच्या विमानतळावर ते उतरवलं पाहिजे असं म्हटलं. आंतरराष्ट्रीय मानकानुसार विमानाचं उड्डाण सुरु असल्याचं नितीन जाधव म्हणाले. नितीन जाधव यांनी विमानातून इंधन ड्रॉप करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.
विमानाचा संपर्क तुटलेला नाही ही चांगली बाब आहे. एका इंजिनवर ते विमान विमानतळावर उतरवलं जाऊ शकतं, असं नितीन जाधव म्हणाले.
फ्लाय दुबई कंपनीचं विमान ५७६ (बोईंग ७३७-८००) हे काठमांडूहून दुबईला रवाना झालं. काठमांडू विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर विमानाला आग लागली. मात्र, आता नेपाळच्या विमान वाहतूक संचलनालयानं दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती सामान्य असून ते विमान दुबईकडे रवाना झालं आहे.
नेपाळच्या पर्यटन मंत्री सुदन किरात्री यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान सुरक्षितपणे दुबईकडे जात आहे. विमानानं ७.५५ मिनिटांनी काठमांडू विमानतळावरुन उड्डाण केलं होतं. ते नियोजित वेळेप्रमाणं ४ तास ५५ मिनिटांनी दुबईत पोहोचणार होतं. मात्र, सध्याच्या स्थितीनुसार विमान १ तास उशिरा पोहोचणार आहे.