मुंबई :सिने तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात करीयरची संधी असल्याचे सांगून दुबईला पाठवायचे आणि त्यांच्या बॅगेत ड्रग्ज टाकून विमानतळावरच अटक घडवून आणायची. यानंतर त्यांच्या सुटकेच्या नावाखाली कुटुंबियांकडून लाखो रूपये उकळायचे. अशाप्रकारे एका अभिनेत्रीसह पाच जणांना दुबईच्या तुरूंगात अडकविणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. राजेश बोभाटे उर्फ रवी आणि ऍन्थोली पॉल अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.सांताक्रूझच्या वाकोला परिसरात एक अभिनेत्री वास्तव्यास असून नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये अभिनय करते. मार्च महिन्यात या अभिनेत्रीच्या आईच्या मोबाइल एक संदेश आला आणि त्यावर मुलीचे करीयर घडवायचे असल्यास सांताक्रुझ येथील एका हॉटेल मध्ये भेटण्यास सांगितले. त्यानुसार महिला आपल्या मुलीसह हॉटेल मध्ये जाऊन रवीला भेटली. एक कंपनी हॉलिवूड मध्ये वेब सिरीज काढत असल्याचे सांगितले. त्या वेब् सीरिजसाठी दुबईला ऑडिशन होणार आहे. त्याचा खर्च कंपनी करणार असल्याचे महिलेला सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेऊन महिलेने अभिनेत्रीला दुबईला पाठवले.

खारघर दुर्घटनेचा प्रश्न उच्च न्यायालयात; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी
१ एप्रिलला अभिनेत्री ही दुबईला जाण्यासाठी निघाली. रवीने अभिनेत्रीला एक ट्रॉफी दिली होती. विमानतळावरून बाहेर पडताच अभिनेत्रीला शारजा पोलिसांनी अटक केली. याबाबत समजताच तिच्या पालकांनी रवीला संपर्क केला. त्याने दुबई पोलिसांत ओळख असून मुलीला सोडविंण्यासाठी ८० लाख खर्च येईल असे सांगितले. हा डाव असल्याचे लक्षात येताच अभिनेत्रींच्या आईने मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार केली.

प्रकरण गंभीर दिसत असल्याने युनिट १० चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत, सहायक निरीक्षक धनराज चौधरी, धनावडे, चिकणे, ठोंबरे, चव्हाण, दया खाडे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासामध्ये पैसे उकळण्यासाठी हा सारा बनाव केला गेल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी एका प्रतिष्ठीत बॅंकेत अधिकारी पदावर असलेल्या रवी याला ताब्यात घेतले.

तीन वाहनांचा भीषण अपघात, प्राध्यापकाचा मृत्यू , दुसऱ्याच दिवशी होता रिटायरमेंटचा कार्यक्रम
त्यांच्या चौकशीत ॲन्थोनी याचे नाव समोर आले. बेकरीचा व्यवसाय करणाऱ्या ॲन्थोनी यालाही अटक करण्यात आली. या आरोपींनी अभिनेत्रीप्रमाणे आणखी चौघांना अशाचप्रकारे अडकविण्याचे समोर आले. तिघे भारतात परतले असून दोघे अद्यापही दुबईच्या तुरूंगात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोलापूर, उस्मानाबाद, लातूरकरांना मोठा दिलासा; पुणे-लातूर-पुणे रेल्वे सेवा सुरू होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here