करोनाच्या काळात ठाणे महापालिकेने काही परिचारिकांना नियुक्त केले होते. त्यानंतर ठेकेदाराच्या माध्यमातून काम करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. त्याविरोधात जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी महापालिकेच्या बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयासमोर आंदोलन केले होते. त्या आंदोलनानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जाधव यांना अटक झाली होती. अटकेनंतर जाधव यांनी ठाणे दिवाणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी अधिक वेळ मागितल्यानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. आज दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला.
वाचा:
वसई-विरार महापालिकेतील आंदोलनाप्रकरणी जाधव यांना तडीपारीची नोटीसही बजावण्यात आली होती. त्यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही रंगले होते. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आपल्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप जाधव यांनी केला होता.
वाचा:
अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाधव यांना खास निरोप पाठवून धीर दिला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times