नवी दिल्ली
जेएनयूतील हल्ल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळगलेल्या मौनाबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी कडक शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी हे एकतर हल्लेखोरांच्या बाजूने किंवा अकार्यक्षम आहेत, असा आरोप येचुरी यांनी केला आहे.

जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत. ठिकठिकाणी विद्यार्थी आंदोलनातून जेएनयू हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आहेत. मात्र, पंतप्रधान मोदींनी यावर अद्याप मौन बाळगलं आहे.

‘मोदींचं मौन सारंकाही सांगून जातं. पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून काही किलोमीटर अंतरावर विद्यार्थ्यांना मारहाण होते आणि त्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. याचा अर्थ एकतर ते हल्लेखोरांच्या बाजूनं आहेत किंवा ते अकार्यक्षम आहेत’, असा आरोप येचुरी यांनी केला आहे.

दरम्यान, जेएनयूतील हल्ल्याप्रकरणी विद्यापीठाच्या कुलगुरुंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील माकपने केली आहे. विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांसाठी कुलगुरुच जबाबदार आहेत, असे माकपने म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here