पुणे: पुणे – सोलापूर महामार्गावर असणाऱ्या दौंड तालुक्यातील भांडगाव येथे दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात एक खासगी प्रवासी बस पलटी होऊन १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. काल सोमवारी रात्री नऊ वाजता हा अपघात घडला आहे. या घटनेमुळे काहीवेळ वाहतूक मोठी कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

अपघातातील जखमींची नावे : –

राहुल गंगाधर तरटे (रा.नर्सीगरोड नांदेड),

कु.नेहारीका नागनाथ हांडे, शंकुतला दिंगबर वाळके, कु.साक्षी नागनाथ हांडे (तिघे रा.देहू आळंदी, पुणे)

विग्नेश रमेश गकुला (रा.उमरगा जि.धाराधीव)

पुष्पराज हनुमंतराव पाटील (रा.गुरूनिवास श्रीनगर नरसिंगरोड ता.मुखेड जि.नांदेड)

ऐरना जठार गुमेरला (रा.चेंगल ता.विमगल जि.निजामबाद)

माणिकेम मुतीराज जकाला, मुनीराज मुताबा जकाला (दोघे रा.तळोजा कॉम्प्लेक्स मुंबई)

सुलोचना कृष्णा रेड्डी (रा.उपरमाल्याना ता.गंगाधरा जि.करीमनगर)

वक्तव्याने खळबळ अन् महाविकास आघाडीच्या फुटीची चर्चा; मात्र शरद पवारांची पुन्हा गुगली, आता म्हणाले…
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक खासगी ऑरेंज कंपनीची प्रवासी बस मुंबई ते निजामाबाद असा प्रवास करत होती. ती बस दौंड तालुक्यात पुणे – सोलापूर महामार्गावर भांडगाव गावच्या हद्दीत आली असताना अचानक दुचाकीस्वार समोर आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात बस महामार्गावर पलटी झाली. या भीषण अपघातात १० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये एकूण ३८ प्रवासी प्रवास करत होते.

अपघाताची माहिती मिळताच तातडीने यवत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी तातडीने जखमींना उपचारासाठी चौफूला आणि यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यवत ग्रामीण रुग्णालयातील चार गंभीर जखमी रुग्णांना ससून येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

कोणाचा कंडका पडणार? राजाराम कारखान्याची मतमोजणी सुरू; सतेज पाटील, महाडिकांची प्रतिष्ठा पणाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here