चंद्रपूर : विवाहबाह्य संबंधाचा धक्कादायक शेवट झाल्याची घटना जिल्ह्यात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने गळफास घेत जीवन संपवलं. ही घटना मूल शहरात घडली. प्रेयसीला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. बंडू निमगडे असं मृतकाचं नाव आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूल येथील बंडू उर्फ रामचंद्र निमगडे या विवाहित व्यक्तीचे शहरातीलच एका विवाहित महिलेशी संबंध होते. बंडू हा विवाहित होता. त्याला एक मुलगा आहे. शेजारी असलेल्या विवाहितेशी बऱ्याच वर्षांपासून त्याचे प्रेमसंबंध होते. त्यांचा प्रेमसंबधाची चर्चा अधूनमधून व्हायची. त्यामुळे पत्नीसोबत बंडूचे नेहमी खटके उडायचे. नेहमी त्या दोघांची भांडणं होत होती. यामुळे तो मानसिकरित्या अस्वस्थ झाला होता. अशातच त्याने सोमवारी प्रेयसीचं घर गाठलं. रागाच्या भरात त्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतलं. तिला जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली. या प्रकारानंतर बंडू स्वत:च्या घरी पोहोचला त्याने आणि गळफास लावून आत्महत्या केली.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

पोलिसांना घटनेची माहिती मिळतात ते घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणात अत्यवस्थ झालेल्या प्रेयसीला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात हलवलं. प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनेचा पुढील तपास मूल पोलीस करत आहेत.

३० वर्षीय तरुणीचे ५५ वर्षीय विवाहित पुरुषासोबत लिव्ह-इन, २२ वर्षीय तरुणाशी सूत जुळलं न्…
शहरातील त्या घटनेचा अद्याप विसर नाही….

काही दिवसापूर्वी विवाहबाह्य संबंधातून झाडीपट्टीतील एका कलाकारने प्रेयसीच्या नावाने फेसबुकवर पत्र लिहून आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आता मूल शहरातील घटनेने जिल्हा हादरला आहे.

खरेदीसाठी गेले, घरी येताना टेम्पोची बाईकला धडक; सिल्लोडमधील सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू
कुटुंब उध्वस्त…

जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून आत्महत्या तसंच हत्या अशी अनेक प्रकरणं वाढली आहेत. अशा घटनांमुळे कुटुंबच्या कुटुंब पुरती उध्वस्त झाल्याचं समोर आलं आहे. मूल शहरातील आत्महत्या केलेल्या प्रियकराला एक मुलगा आहे. प्रेयसीलाही एक मुलगा आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंब मानसिक तणावात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here