तसेच एखादी मालमत्ता विकताना विक्री करार (सेल डीड) आणि इतर कागदपत्रे कामी येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महत्त्वाच्या कागदपत्राविषयी माहिती देणार आहोत, आणि ते म्हणजे सेल डीड. विक्री डीड हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज असून मराठीमध्ये सेल डीड म्हणजे विक्रीसाठी केलेला करारनामा.
विक्री करार म्हणजे काय?
हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे, जो मालमत्तेच्या मालकाला किंवा विक्रेत्याला मालमत्तेचे अधिकार खरेदीदाराच्या नावावर हस्तांतरित करण्याचा अधिकार देतो. विक्रेत्याने विक्री कराराचा मसुदा तयार केल्यानंतर मालमत्तेची नोंदणी स्थानिक उपनिबंधक कार्यालयात करावी. जमीन खरेदी करण्यासाठी लोकांना नोंदणी करावी लागते. तसेच विक्री कराराची (डीड सेल) नोंदणी केल्यानंतरच नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते. सर्वप्रथम, जमीन खरेदीदार आणि विक्रेत्याने परस्पर संमतीने विक्रीपत्र तयार करून घ्यावे. यानंतर केवळ या विक्री कराराच्या आधारे ऑनलाइन नोंदणी केली जाते, ज्या जमिनीसाठी नोंदणी केली जात आहे.
सेल डीड हा मुख्य कायदेशीर दस्तऐवज असतो, जो विक्रीची पुष्टी करतो आणि मालमत्तेची मालकी विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतरित करतो. विक्री कराराच्या नोंदणीसह, मालमत्ता खरेदीची प्रक्रिया समाप्त होते.
विक्री करार आवश्यक का?
अनेक वेळा लोक विचारतात की सेल डीड किंवा विक्रीचा करार करणे बंधनकारक आहे का? तर याचे उत्तर होय आहे. विक्री कराराची नोंदणी करणे फार महत्वाचे असते. जोपर्यंत विक्री करार नोंदणीकृत होत नाही तोपर्यंत खरेदीदार कायदेशीररित्या मालमत्तेचा मालक बनू शकत नाही. मालमत्तेच्या हस्तांतरण कायद्यानुसार विक्री करारामध्ये अनेक कलमे असली पाहिजे. तर विक्री कराराचा मसुदा तयार करताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये इमारत योजना, बिल्डरचे वाटप पत्र, टॅक्स स्लिप, युटिलिटी बिल (वीज), पॉवर ऑफ ॲटर्नी (लागू असल्यास), टायटल दस्तऐवज आणि मालमत्तेच्या पुनर्विक्रीच्या बाबतीत सर्व पूर्व-नोंदणीकृत करार यांचा समावेश आहे.