बीड :बीड तालुक्यातील मौजे पिंपळनेर येथील शिवराज अशोक वायभट (वय वर्ष १०) या मुलाचा बेलेश्वर संस्थान परिसरातील सोनाली तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस झाली आहे.बीड जिल्ह्यातील पिंपरनई येथील सुप्रसिद्ध बेलेश्वर मंदिरात गेल्या तीन दिवसांपासून सप्ताह सुरू असून या सप्ताहाची काल सांगता झाली. मात्र यावेळी एक मुलगा मंदिरातून दुपारपासूनच गायब होता. कुटुंबातील लोक त्याचा शोध घेत होते. मात्र अचानक सायंकाळी ५ वाजता तळ्याच्या कडेवर कपडे व चप्पल आढळली. दुपारपासूनच शिवराज हा मंदिरातून गायब होता आणि दुपारपासून मंदिरात न दिसल्याने त्याचा कुटुंबीयांनी सर्वत्र शोध सुरू केला. या शोधा दरम्यानच तलावाच्या काठावर शिवराजचे कपडे आणि चपला सापडल्या. मात्र शिवराजचा कुठेही पत्ता नव्हता.

शिवराजचे कपडे आणि चपला सापडल्याने ही बातमी गावात आणि सप्ताहात सर्वत्र पसरली. त्यानंतर गावकऱ्यांनी या तलावाच्या परिसरात धाव घेत शोध सुरू केला. काही जण या तलावात उतरले. मात्र बराच वेळ गेल्यानंतरही शिवराजचा थांगपत्ता लागला नाह. काही वेळानंतर शिवराजचा मृतदेह एका जणाच्या हाती लागला.

मुलीच्या मृतदेहासोबत ४ दिवस राहत होती ६८ वर्षीय आई, डिलीव्हरी बॉयमुळे भयंकर दृष्य समोर

शिवराजचा मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर कुटुंबियांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. अशोक वायभट यांना तीन मुले असून शिवराज थोरला मुलगा होता. चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here