नवी दिल्ली : दिल्लीत एका चार मजली इमारतीत राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वृद्ध दाम्पत्याचं स्वत:चं घर होतं. ते चार मजली इमारतीत ते पहिल्या मजल्यावर राहत होते आणि वरील मजले भाडेतत्वावर राहायला दिले होते.

दिल्लीतील शक्करपूर भागात ही घटना घडली. दिल्लीतील करोडपती दाम्पत्यांच्या हत्येनंतर एकच खळबळ माजली आहे. इमारतीमध्ये एका खोलीत ७९ वर्षीय आर. के. बरारू यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तर बाथरुममध्ये ७५ वर्षीय त्यांची पत्नी दुर्गा यांचा मृतदेह होता. हे पती-पत्नी १९७० पासून या घरात राहत होते. या दोघांची मुलं नोएडा आणि गुरुग्राममध्ये राहत होते. पहिला मजला सोडून संपूर्ण इमारत भाड्याने देण्यात आली होती. इथे राहणाऱ्या भाडेकरुंचं वेरिफिकेशन करण्यात आलं होतं.

दिल्ली पोलिसांसाठी हे केस एक चॅलेंज ठरत आहे. ७९ वर्षीय बरारू हे रिटायर्ड होते. त्यांची पत्नी दुर्गा या अल्झायमरचा रुग्ण होत्या. हळू-हळू त्यांची तब्येत बिघडत चालली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी घरात एक हाऊस हेल्प ठेवण्यात आला होता.

घरमालकासोबत बायकोचे अनैतिक संबंध, भाडेकरूने साथीदारासोबत काढला काटा

डबल मर्डरमध्ये ४० हून अधिकांची चौकशी

या पती-पत्नीच्या हत्येबाबत जवळपास ४० जणांची चौकशी करण्यात आली. घरात कोणीही जबरदस्तीने घुसलं नसल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे मारेकरी हा ओळखतीला असून तो सहजपणे घरात घुसला असल्याचा अंदाज होता. या भागातील भाजीवाले, किराणा, भाडेकरू, हाउस हेल्प, नातेवाईक सर्वांची चौकशी करण्यात आली होती. परंतु पोलिसांना कोणतेही पुरावे मिळत नव्हते.

मुलीच्या मृतदेहासोबत ४ दिवस राहत होती ६८ वर्षीय आई, डिलीव्हरी बॉयमुळे भयंकर दृष्य समोर
घरातील जेवण करणाऱ्या महिला बदलल्या

बरारू यांच्या घरी काही दिवसांपूर्वी एक शिक्षण त्यांना कॉम्प्युटर शिकवण्यासाठी येत होता. बरारू हे ज्या लॅपटॉपवर शिकत होते तो लॅपटॉपही घरातून गायब होता. पोलिसांनी त्या कंप्यूटर शिक्षकाचीही चौकशी केली. पण त्यातही कोणता संशय किंवा पुरावे आढळले नाहीत. त्या काळात या वृद्ध जोडप्याने त्यांच्यासाठी जेवण बनवणारी महिला बदलली होती. मात्र तिथेही पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही.

अतिकच्या हत्येनंतर ८०० फोन अचानक बंद, मोठा मुलगा उमरच्या वागण्यातही बदल; नेमकं काय झालंय?
दिल्ली प्रॉपर्टी डीलर्सवर पोलिसांचा संशय

आता पोलिसांना शेवटचा संशय प्रॉपर्टी डिलर्सवर होता. हे जोडपं त्यांच्या बिल्डिंगचा एक मजला विकू इच्छित होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. जे प्रॉपर्टी डिलर्स त्यांच्या इमारतीच्या खरेदीसाठी आले होते त्या सर्वांची चौकशी करण्यात आली. मात्र इथेही कोणतेही पुरावे, संशयित आढळले नाहीत.

कामगाराला खोदकाम करताना मिळाला १३६ वर्ष जुना खजिना, रात्रभर झोपला नाही; दुसऱ्या दिवशी उठून…
हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला १५ लाखांच्या बक्षिसाची घोषणा

२०१२ मध्ये दिल्लीत झालेला ही डबल मर्डर केसची केस उलगडली जात नव्हती. कित्येक वर्ष होऊनही या हत्येबाबत कोणतीही पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. याच दरम्याव फेसबुकवर एक पोस्ट पाहून पोलिसांना मोठा धक्का बसला. वृद्ध दाम्पत्यांच्या कुटुंबाने फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये हत्येची माहिती देणाऱ्याला १० ते १ लाखांचं बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली होती. या पोस्टनंतर हत्येबाबत काही माहिती मिळेल अशी आशा होती. मात्र अनेक प्रयत्न करुनही हल्लेखोरांची माहिती मिळाली नाही. अखेर पोलिसांनी ही केस बंद केली असून दिल्लीची ही डबल मर्डर केस एक मिस्ट्री बनून राहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here