शारजाह:सचिन तेंडुलकरने आपल्या कुटुंबासोबत आपला ५०वा वाढदिवस गोव्यामध्ये साजरा केला. सचिन तेंडुलकरला अनेकांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या. इतकेच नव्हे तर काही अविस्मरणीय भेटीदेखील सचिनला मिळाल्या. पण या सगळ्या दरम्यान सचिनला अजून एक खास गिफ्ट मिळालं आहे पण तरीही त्याची एक इच्छा मात्र अपूर्ण राहिली आहे.शारजाह क्रिकेट स्टेडियमने सचिन तेंडुलकरल आत्याच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त एक खास भेट दिली आहे. या क्रिकेट स्टेडियमच्या वेस्ट स्टँडचे नाव बदलून ‘सचिन तेंडुलकर स्टँड’ असे भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले. केवळ भारतीय दिग्गजाच्या वाढदिवसासोबतच नाही तर १९९८ मध्ये खचाखच भरलेल्या स्टेडियमसमोर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्याच्या पाठोपाठ शतकांना २५ वर्षेही पूर्ण झाली. मात्र, सचिन या खास प्रसंगी गोव्यात असल्याने शारजाहला पोहोचू शकला नाही.

सचिन…नाम तो सुना होगा! ज्यांच्याशी नेहमीच घेतलाय भारताने पंगा त्याच देशाकडून सचिनला मोठी भेट
तेंडुलकरने २२ एप्रिल रोजी भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तिरंगी मालिकेत १४३ धावा केल्या आणि दोन दिवसांनी कोका-कोला कपच्या अंतिम सामन्यात १३४ धावा केल्या. तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ शतके झळकावली आणि ३४ स्टेडियममध्ये खेळला आहे. परंतु शारजाह क्रिकेट स्टेडियममधील त्याची ७ शतके जगभरातील त्याच्या चाहत्यांकडून अजूनही कौतुकासह साजरी केली जातात.

शारजाहमधील क्रिकेट स्टेडियममधील स्टँडला त्याचे नाव दिल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना, सचिन संदेशात म्हणाला, ‘मी तिथे असू शकलो असतो, परंतु दुर्दैवाने माझ्या आधीच्या वचनबद्धता होत्या. शारजाहमध्ये खेळणे हा नेहमीच चांगला अनुभव राहिला आहे. रोमहर्षक वातावरणापासून ते प्रेम, आपुलकी आणि पाठिंब्यापर्यंत शारजाह हे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आणि जगभरातील क्रीडा चाहत्यांसाठी एक खास ठिकाण आहे. याने आम्हाला अनेक खास क्षण दिले आहेत. डेझर्ट स्टॉर्म मॅचच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त आणि माझ्या ५०व्या वाढदिवसाच्या या खास सोहळ्यानिमित्त श्री बुखातीर आणि त्यांच्या टीमचे खूप खूप आभार.”

शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये आजही सर्वाधिक एकदिवसीय सामने (२४४) खेळले गेले असल्याचा गिनीज रेकॉर्ड आहे आणि हे मैदान क्रिकेट इतिहासातील काही अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार आहे. डेझर्ट स्टॉर्मच्या वर्धापनदिनानिमित्त, शारजाह स्टेडियमचे सीईओ खलाफ बुखातीर म्हणाले, “क्रिकेट खेळासाठी खूप काही केल्याबद्दल सचिनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. खरंच, ही एक अविश्वसनीय खेळी होती आणि अंतिम फेरीत त्याची पुनरावृत्ती झाली.”

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here