बारामती :दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, काय कापाकापी करायची, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा, अशा मिश्किल शब्दांमध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले. अजितदादांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यात मात्र चांगलीच खसखस पिकली.कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनलच्या माध्यमातून जाहीर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, माझ्या विषयी अनेक बातम्या पसरवण्याचे काम केलं. पत्रकार जरा कुठ गेलं तर अजित पवार नॉट रिचेबल. बाकी लोक आहेत की… माझ्यामागे का आहेत बाबा? एखाद्याच्या मागे लागायचं म्हणजे किती मागे लागायचे? मी असं का बोललो, असं विचारले जाते. मी मला येतं ते बोलतो. लोकांना असं वाटतं की २०१९ ला जसं केलं, तसंच जातो की काय. पण मी आज तुम्हाला सांगतो की मी कायमच राष्ट्रवादीमध्ये राहणार आहे, असा पुनरुच्चार अजित पवारांनी केला. अजित पवार आणि बारामती असं एक नातं तयार झाले आहे. येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका असे आव्हान पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

१०० कलाकारांच्या तमाशाला २ लाख देत नाहीत, गौतमी पाटीलला पाच लाख देतात : रघुवीर खेडकर

आज विरोधक इथे काही खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधकांना माझं सांगणे आहे की राज्यात आणि केंद्रात त्यांचे सरकार आहे. त्यांनी काय आणले आपल्या बारामतीसाठी? यांनी काहीच आणले नाही, जे आहे ते बिघडवण्याचे काम सुरू असल्याचे पवार म्हणाले.

विधानसभेला चंद्रकांतदादांसाठी सीट सोडली, मेधा कुलकर्णी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीस उत्सुक

मी सरकारला कोणताही सॉफ्ट कॉर्नर देत नाही

मी विशिष्ट नेत्यांच्या बाबतीत सॉफ्ट आहे, असं बोललं जातो. पवार साहेबांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आपण पुढे घेऊन जाण्याचे काम करतो आहे. एखादा माझ्या विचाराचा नसेल तर त्याच्या गचुद्याला पकडू का? अनेक राज्यात विधान भवनात हाणामारी होते. मी सरकारला कोणताही सॉफ्ट कॉर्नर देत नाही. कंगना राणावतचा सिनेमा आहे. तुम्हाला वाटेल याला कसं माहिती कंगना राणावत. तुम्हाला जसे सिनेमा पाहावा असे वाटते तसे मला देखील पाहावं वाटतं, असं अजितदादा म्हणाले.

आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावे बनावट पत्र व्हायरल, पुण्यातील तरुणाला अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here