नवी मुंबई: नवी मुंबई शहर हे नामांकित शहर म्हणून ओळखले जाते. तसेच विविध नाविन्यपूर्ण कल्पना, योजना देखील राबवल्या जातात. मात्र, या शहरामध्ये गुन्हेगारी क्षेत्राला आळा बसण्याऐवजी वाढतच चाललेलं आहे. क्षुल्लक कारणावरून एकमेकांमध्ये वाद झाल्याने टोकाचे पाऊल उचलले जाते. थोडे काही वाद झाले की लगेच जीवे मारणे हे जणू फॅडच आजच्या काळातील समाजात पाहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना वाशी रेल्वे स्टेशन जवळ घडल्याचं निदर्शनास आलं आहे. यामध्ये एका तरुणावर शस्त्राने वार करुन तोंड दगडाने ठेचून आणि मारहाण करत त्याची हत्या केली आहे .

हार्बर रेल्वे मार्गावर वाशी रेल्वे स्टेशनजवळ या तरुणाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाच्या शरीरावर शस्त्राने वार केल्याचे आणि दगडाने मारहाण केल्याचे व्रण आढळले आहेत.

जगातील एकाही खेळाडूला शक्य झाले नाही ते अजिंक्यने करून दाखले; IPLमधून थेट कसोटी संघात
वाशी आणि सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये पामबीच रोडच्या पुलाखालील खड्यामध्ये सकाळी ९ च्या दरम्यान एका अज्ञात तरूणाचा मृतदेह रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आला. स्टेशन मास्तर एस. के. सिंग यांनी याविषयी वाशी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन दराडे यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पुलाजवळ खोदलेल्या खड्यात २८ ते ३० वर्ष वयाच्या तरूणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोळ्याच्या भुवईवर, उजव्या गालावर, ओठावर आणि हनुवटीवर जखमा आढळून आल्या. त्याच्यावर शस्त्राने वार केले होते. दगडाने मारहाण केल्याचंही आढळून आलं आहे. या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

नवी मुंबई शहरामध्ये चाकू भोसकून मारणे, गोळीबार करणे, दगडाने ठेचून मारणे, गळा दाबणे अशा विचित्र पद्धतीने जीव घेण्याचे प्रकार सरार्सपणे चालू आहेत. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे अगदी चोखपणे आपल्या पदाला न्याय देतात. मात्र, नवी मुंबईतील या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसवण्यासाठी कोणती कल्पना वापरणार हे पाहणे आता महत्वाचं ठरणार आहे.

संतापजनक! नवऱ्याचं निधन; तेराव्याच्या दिवशीच बायकोवर अतिप्रसंग; दीराचं धक्कादायक कृत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here