भोपाळ:जिच्यासोबत साता जन्माच्या शपथा घेतल्या तिलाच पतीने क्रूरपणे संपवलं आहे. आधी त्याने तिला बेदम मारहाण केली, मग गळा आवळून तिचा खून केला आणि त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचाही जाच केला. पत्नीची हत्या केल्यानंतर या राक्षस पतीने घराच्या मागील बाजूला पत्नीचा मृतदेह जाळला. हे सर्व भरदिवसा घडत होतं, पण कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही. काही शेजाऱ्यांनी त्याला विचारलंही की काय जाळत आहेस, त्यावर तो म्हणाला की सापाला जाळतोय. अवघ्या २४ तासात त्याने पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि कोणाला कळालंही नाही.मध्य प्रदेशातील धारमधील पिपरीपुरा देहर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी राधू हा पत्नी दयासोबत येथे राहत होता. राधूची पत्नी काही दिवसांपासून घरी दिसत नव्हती. म्हणून शेजारच्यांनी तिच्याबद्दल विचारणा केली. तेव्हा राधूने सांगितले की ती नर्मदेच्या परिक्रमेला गेली आहे. दयाचे माहेरचेही तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र, तेही दयासोबत बोलू शकत नव्हते, कोणालाच माहित नव्हते दया कुठे आहे.

अडखळत चालत होता, तरीही पोलिसांना संशय, प्लास्टर कापून पाहिलं तर कोट्यवधींचं घबाड सापडलं…
भावाने बेपत्ता असल्याची तक्रार दिली

काही दिवसांनी दयाच्या माहेरच्यांना राधूवर संशय आला आणि तिच्या भावाने दया बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करत सर्वात आधी पतीला ताब्यात घेतलं. राधूने पोलिसांच्या तपासात जे सांगितलं ते ऐकून पोलिसही हैराण झाले. सुरुवातीला राधूने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली पण अखेर त्याने आपला गुन्हा कबुल केला आणि सांगितलं की आता फक्त दयाची हाडंच उरली आहेत.

योगींची दहशत, एन्काऊंटरने थरकाप, कुख्यात गुंड अतिक अहमदही थरथरायला लागलाय

राधूने जिथे दयाला जाळलं तिथेच तिच्या अस्थी पुरल्या. पोलिसांनी राधूने सांगितलेल्या जागी तपास केला असता त्यांना दयाची हाडं आढळून आली. तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला.

जमीन विकण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला

राधूने काही काळापूर्वी जमिनीचा तुकडा विकला होता. पण, दयाला ती जमीन विकाायची नव्हती. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. त्यादिवशीही याचप्रकरणावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि मारहाणीपर्यंत पोहोचलं. त्यानंतर राधूने दयाचा गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचा मृतदेह घराच्या मागच्या बाजूला जाळण्याचा निर्णय घेतला. तिला जाळल्यानंतर त्याने तिच्या अस्थी तिथेट जमिनीत गाडल्या.

२००० वर्ष जुना खजिना सापडला, जमिनीत पुरलेला होता, पाहून पुरातत्त्वशास्त्रज्ञ भलतेच खूश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here