मुंबईः राज्यात करोना साथीचा संसर्ग वाढत असला तरी मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या मात्र स्थिर आहे. मुंबईतील करोना संसर्ग जरी आटोक्यात आला असला तरी पुन्हा रुग्णसंख्या वाढू नये म्हणून पालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता गावाहून मुंबईत परतणाऱ्या नागरिकांना १४ दिवस होम क्वारंटाइन व्हावे लागणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हजारो चाकरमानी आपल्या मुळ गावी गेले आहेत. तसंच, लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर अनेक जण मुंबईसोडून गावी परतले होते. मात्र, आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक जण पुन्हा मुंबईत परतत आहेत. याच पार्श्वभूमीवर पालिकेनं हे नवे आदेश जारी केले आहेत. मुंबईत पुन्हा करोनाचा संसर्ग वाढु नये म्हणून म्हणून प्रशासनानं हे पाऊल उचललं आहे. सरकारी कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मात्र काही प्रमाणात मुभा असणार आहे. मुंबईत आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना दोन दिवस आधी परवानगी घ्यावी लागणार आहे.

वाचाः

दरम्यान, मुंबईत काल दिवसभरात ९१० नवे रुग्ण आढळले आहेत तर दुसरीकडे ९८८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. करोनावर मात करणाऱ्या एकूण कोविड योद्ध्यांची संख्या ९२ हजार ६६१ इतकी झाली आहे. मुंबईतील करोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के इतके असून ३० जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीतील रुग्णवाढीचा वेग ०.८७ टक्के इतका आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता ८० दिवसांवर पोहचला आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here