नवी मुंबई :पनवेल हद्दीतील कर्नाळा खिंडीत विचित्र अपघाताची घटना घडली आहे. पनवेल आगारातून महाडकडे जाणारी वातानुकूलित शिवशाही बस पलटी झाली. मंगळवार दिनांक २५ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यात सुमारे १८ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातावेळी ही बस प्रवाशांनी खच्चून भरलेली होती. बसमधून ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.

पुण्यातील नवले पुलावर बस आणि ट्रकचा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू तर बावीस जण जखमी

अपघातग्रस्त बस क्रमांक MH ०९ EM ९२८२ ही पनवेल आगारातून महाडकडे जात होती. कर्नाळा खिंडीत चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याखाली घसरून पलटी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात १८ प्रवासी जखमी असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहेत. तसेच एक प्रवासी गंभीर असल्याने त्याला कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजतेय.

VIDEO | ही साडी मी घेणारे, ए गप गं! म्हैसूर सिल्क दोघींना आवडली, मग भर दुकानातच धपाधप
अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर २ रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी मदतकार्य करत आहेत. अपघातामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

गाडी कुठेय? अरे! घराचं दारही तोडलंय; पुण्याला गेलेल्या कुटुंबाघरी चोरी, अखेर घरफोडे जेरबंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here