विश्वनाश पटनायक यांच्या करिअरची सुरुवात बँकर म्हणून झाली. त्यांनी अनेक वित्तीय संस्थांमध्ये काम केले. प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर २००९ मध्ये त्यांनी स्वत:चं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नोकरी सोडून उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एकामागून एक अनेक कंपन्या उघडल्या. दोन कंपन्यांची भागीदारी विकत घेतले. यापैकी एक आरबीआय परवानाधारक कंपनी होती आणि दुसरी शेअर बाजारात लिस्टेड कंपनी होती. कंपनी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केले. २०१४ पर्यंत त्यांचा व्यवसाय पूर्णत: स्थिरावला होता.
विश्वनाथ पटनायक यांनी अनेक क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. त्यांनी हेल्थकेअर, फिनटेक, रिटेल, ग्रीन सोलर एनर्जी, रिफायनरी यांसारख्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. परदेशी कंपन्यांमध्येही त्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांनी गोल्ड रिफायनरीतही गुंतवणूक केली आहे.
श्लोका-आकाशकडे गुड न्यूज, मुकेश अंबानींनी घेतली सुनेची विशेष काळजी
विश्वनाथ पटनाईक हे दानधर्म करण्यात नेहमीच पुढे राहिले आहेत. व्यवसायात स्थिरता येताच त्यांनी शक्य तितकी देणगी देण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक धर्मादाय ट्रस्ट्सला देणगी दिली. भारताव्यतिरिक्त त्यांनी युनेस्कोलाही देणगी दिली. पटनायक यांनी ५०० गरीब मुलींना शिकवण्याचा निर्णय घेतला.
विश्वनाथ पटनायक यांनी आता ब्रिटनमध्ये उभारल्या जाणाऱ्या पहिल्या जगन्नाथ मंदिरासाठी २५० कोटींची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती श्री जगन्नाथ सोसायटी ऑफ यूकेचे अध्यक्ष डॉ. सहदेव स्वैन आणि फिनेस्ट ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अरुण कर यांनी दिली. विश्वनाथ पटनायक यांना ओदिशाप्रमाणे ब्रिटनमध्येही भव्य मंदिर बनवायची इच्छा आहे. लंडनमध्ये उभारले जाणारे जगन्नाथ मंदिर युरोपमधील जगन्नाथ संस्कृतीचे केंद्र असेल.