छत्रपती संभाजीनगर: आर्थिक कारणावरून एका शिक्षकाने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली आहे. ही घटना २४ एप्रिल रोजी सायंकाळी मुकुंदवाडी रेल्वे पटरीजवळ उघडकीस आली आहे. प्रभाकर राजाराम कानडे (वय ५०, रा. शिवशंकर कॉलनी) असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घाटी रुग्णालयामध्ये गर्दी केली होती. घटनेमुळे कानडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर कानडे यांचे शिवशंकर कॉलोनीत सुव्हर व ईजी नावाचे इंग्लिश स्पोकन क्लासेस होते. ते मुलांना इंग्रजी शिकवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना एक मुलगा असून पत्नी गृहिणी आहे. कमाई बऱ्यापैकी असल्याने त्यांचे काही लोकांशी आर्थिक व्यवहार होते. मात्र, त्यामध्ये दगाफटका बसल्याने ते तणावात होते. त्यातूनच त्यांनी काल दुपारी मुकुंदवाडी रेल्वे गेट नंबर ५६ जवळ रागाच्या भरात रेल्वे समोर उडी घेतली. सोमवार २४ एप्रिल रोजी प्रभाकर हे घरातून बाहेर पडले. मात्र, उशीरापर्यंत ते घरी परतलेच नाही. दरम्यान, दुपारच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वे गेट नंबर ५६ जवळ एका व्यक्तीचा रेल्वे रुळावरती मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसाना माहिती दिली. मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीला तात्काळ घाटी रुग्णाला दाखल केलं. मात्र, सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अनोळखी इसमाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. हा मृतदेह प्रभाकर कानडे यांचा असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळतात त्यांचा कुटुंबीय घाटी रुग्णालयात दाखल झाले. मात्र प्रभाकर हे आत्महत्या करू शकत नाही. हा घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी कुटुंबीयांची काही तक्रार असल्यास त्या दृष्टीने देखील तपास केला जाईल ही माहिती पोलीस हवालदार ए. के. पवार हे करीत आहेत.नातेवाईक म्हणतात हा घातपातप्रभाकर कानडे हे आत्महत्या करूच शकत नाहीत. ते अत्यंत मनमिळाऊ सहभावाचे होते. त्याचा काही जण चुकीचा फायदा उचलत होते. त्यातूनच हा घातपातचा प्रकार घडला असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही सर्व विधी पारपडल्यावर जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकानी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here