अहमदाबाद:गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय योग्य असल्याचे अर्जुन तेंडुलकरने तिसर्‍याच षटकात दाखवून दिले. अर्जुनने सामन्याच्या तिसऱ्या षटकातच गुजरातला पहिला धक्का दिला आणि त्यांच्या धावांना ब्रेक लावला. पण नंतर संघाच्या इतर गोलंदाजांना गुजरातच्या धावांना आळा घालता आला नाही. त्यामुळे गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २०७ धावा केल्या. पण अर्जुनच्या तिसऱ्याच षटकात अंपायरची मोठी चूक दिसून आली.अर्जुनने तिसऱ्या षटकात जीटीचा अनुभवी सलामीवीर रिद्धिमान साहाला बाद केले. अर्जुनने पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी करत संघात संधी देऊन योग्य निर्णय घेतल्याचे दाखवून दिले. पण तिसऱ्या षटकात साहा बाद झाल्यावर त्याने रिव्ह्यू घेतला आणि यावेळेस अम्पायरकडून झालेले चूक दिसून आली. पाहूया नेमकं काय घडलं.

GT vs MI Live Score: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हार्दिकनेच केलं रोहितला बाद
गुजरात टायटन्सच्या डावातील तिसरे षटक अर्जुन तेंडुलकर टाकत होता. ऋद्धिमान साहा त्याच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्ट्राइकवर होता.अर्जुनने साहाला शॉर्ट बॉल टाकला. हा चेंडू साहाच्या मागून बाहेर येत आरामात कीपरकडे जात होता. पण रिद्धिमानने खराब चेंडू समजून शॉट मारण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे तो चेंडूला नीट वेळ देऊ शकला नाही आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेला. यानंतर संपूर्ण मुंबई संघाने जोरदार अपील केले, त्यामुळे पंचांनी बाद दिले. मात्र, साहा बाद झाल्यानंतर एक मोठी चूक पंचांच्या लक्षात आली, जी आता चर्चेत आहे.

वेळ संपल्यानंतरही पंचांनी रिव्ह्यू घेण्याची परवानगी दिली

खरे तर जेव्हा पंचांनी रिद्धीमान साहाला बाद घोषित केले तेव्हा साहा थोडा गोंधळला. त्याला वाटले की तो बाद नाही. अशा स्थितीत त्याने सहकारी खेळाडू शुभमन गिलशी चर्चा केली, त्यानंतर साहाने डीआरएस घेण्याचे ठरवले. मात्र तो रिव्ह्यू घेण्यासाठी गेला तोपर्यंत डीआरएस घेण्याची १५ सेकंदांची वेळ संपली होती.


मात्र असे असतानाही साहाने डीआरएसची मागणी केली आणि पंचांनी रिव्ह्यूला परवानगी दिली. वेळ संपल्यानंतरही पंचांनी डीआरएस घेण्याची परवानगी दिली हे सर्वांच्या समजण्यापलीकडचे होते. विशेष म्हणजे डीआरएसमध्येही साहा बाद झाल्याचे स्पष्ट दिसत होते. रिव्ह्यूमध्ये साहाच्या बॅटची कड चेंडूला लागल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अशा स्थितीत रिद्धिमानला बाद घोषित करण्यात आले आणि तो ७ चेंडूत ४ धावा करून बाद झाला.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here