तुरीच्या भावात तेजी आली असून, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत एप्रिल महिन्यातील मागील काही आठवड्यातील पहिला दिवस अन् त्यादिवशी असलेले दर पुढील प्रमाणे आहेत. सुरुवातीला ३ एप्रिल म्हणजे सोमवार रोजी तुरीचे घसरले होते. या दिवशी ७ हजार पासून ८ हजार ४५० रूपये तर सरासरी भाव ८ हजार इतका होता. त्यानंतर दुसरा आठवड्यात तुरीच्या दरात वाढती दिसून आली. १० एप्रिल (सोमवार) रोजी ७ हजार पासून ८ हजार ६३० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीला भाव मिळाला तर सरासरी भाव ८ हजार रूपये होता. सोमवारी (१७ एप्रिल) रोजी ६ हजार पासून ८ हजार ८०० रूपयेप्रमाणे तुरीला दर मिळाले. मात्र या आठवड्यात पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी तुरीचे दर उतरले.
सोमवारी ६ हजार २०० रूपये ते ८ हजार ७०० रूपयांपर्यत क्विंटलमागे तुरीला भाव मिळाला. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मंगळवारी तुरीच्या दरात क्विंटल मागे १५० रुपयांनी भाव वाढले आहे. त्यामुळ तुरीला सरासरी भाव ८ हजार रूपये इतका होता तर कमीत कमी ५ हजार २०० ते ८ हजार ८५० प्रति क्विंटलप्रमाणे तुरीला भाव होता.
शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा असल्यानं अनेक शतकऱ्यांनी अद्यापपर्यत तुरीची विक्री केली नाही. मात्र सद्यस्थितीत बाजारात भाव वाढले असले तरी तुरीची आवक कमीच आहे. म्हणजेच शेतकरी तूर बाजारात विक्रीसाठी कमी आणत आहेत.
एप्रिल महिन्यात तुमच्या दर स्थिर राहणार असल्याची शक्यता असून ‘मे’ महिन्यात तुरीच्या दरात तेजी येणार असल्याचं संकेत आहेत. म्हणून काही शेतकऱ्यांनी आणखी भाव वाढण्याच्या अपेक्षेने तुरीची विक्री थांबवली आहे. दरम्यान सद्यस्थितीत मिळत असलेल्या तुरीला भाव पांढर सोनं म्हणजेचं कापसाच्या तुलनेत जादा आहे.