पुणे :कसबा विधानसभा पोटनिवडणुकीपासून सुरु झालेलं चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचं सत्र कायम आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी चंद्रकांत पाटील यांनी हू इज धंगेकर असं म्हटलं होतं. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी निवडणुकीत विजय मिळवून दाखवत मी रवींद्र धंगेकर असं प्रत्युत्तर दिलं होतं. आता रवींद्र धंगेकरांनी पुण्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रर शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांतदादा मुळचे पुणेकर नाहीत. ते पाहुणे म्हणून आले आहेत, आणि विधासाभ निवडणुकीच्या लाटेतले ते आमदार आहेत. चंद्रकांत पाटलांनी कुठे ही बोट ठेवावं, महाराष्ट्रात कुठेही त्यांच्या विरोधात लढायला तयार आहे, असं ओपन चॅलेंजच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिले आहे.

वेताळ टेकडीच्या विकास संदर्भात चंद्रकांत पाटील आग्रही आहेत. मात्र, वेताळ टेकडीचा विकास करून ती तोडू नये असा स्थानिकांची आणि स्वतः भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींची मागणी आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी वेताळ टेकडीचा विकास रेटून धरला आहे. या प्रश्नाकडे लक्ष करत रवींद्र धंगेकर यांनी पाटलांना धारेवर धरलं आहे.

Pune : सिंहगड एक्स्प्रेसमध्ये प्रवास किती सुरक्षित?, जागेवरून वाद, ७ जणांची एकाला बेदम मारहाण

यावेळी धंगेकर म्हणाले की, निसर्गाने जे दिलं आहे ते ठेवून विकास करायला काही हरकत नाही. टेकडी फोडून जर पुणेकरांचा निसर्ग खराब करणार असाल तर त्याला पर्यायी व्यवस्था आहे. चंद्रकांतदादा मुळचे पुण्याचे नाहीत? ते पाहुणे म्हणून आले आहेत. मागच्या विधानसभा लाटेतील ते आमदार आहेत, असं धंगेकर म्हणाले.

कामांमध्ये पॉज, हेलिकॉप्टर घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सुट्टीवर जाण्याची कारणं काय?

माझ्या पक्षाने जर आदेश दिला आणि माहाविकास आघाडीने ठरवलं तर चंद्रकांत पाटलांनी राज्यात कुठे ही बोट ठेवावं तिथे मी त्यांच्यासोबत लढायला तयार आहे. कारण ते आपले पुणेकर नाहीत ते मुळचे कोल्हापूरचे आहेत. ते पार्सल कोल्हापूरला पाठवण्याची तयारी भारतीय जनता पार्टी आणि आम्ही केली आहे. कारण पाहुणा जास्त दिवस घरात ठेवायचा नसतो, असं थेट ओपन चॅलेंज धंगेकर यांनी दिलं आहे.

हे कसं काय शक्य आहे… वेळ संपल्यानंतरही साहाला DRS मिळाला, VIDEO मध्ये पाहा पुढे काय घडलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here