वाचा:
भाजपचे आमदार यांनी या संदर्भात मुख्यमंत्री यांना पत्र लिहिलं आहे. ‘सुशांतसिंह आणि दिशाच्या आत्महत्येच्या तपासाच्या प्रकरणात दोन पोलीस अधिकारी व पोलीस आयुक्तांनी कमालीचा हलगर्जीपणा दाखवला आहे. सुशांतच्या आत्महत्येला ५० दिवस उलटून गेले असतानाही पोलिसांनी साधा एफआयआर दाखल केलेला नाही. तसंच, दिशा सालियनाच्या आत्महत्येनंतर ५० दिवसांनी या संदर्भातील माहिती असल्यास आम्हाला द्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलंय. हा निव्वळ हलगर्जीपणा आहे. या प्रकरणातील पुरावे जाणीवपूर्वक नष्ट केले जात असल्याची भावना जनमाणसात निर्माण झाली आहे. राज्य सरकार लपवाछपवी करतेय की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं. तसंच, सुशांतसिंह प्रकरणाच्या हत्येचा तपास विशिष्ट टप्प्यावर येईपर्यंत परमवीर सिंग यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावं,’ अशी मागणी भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे. ‘ही कारवाई न झाल्यास केंद्रीय गृहमंत्र्यांकडे दाद मागेन,’ असंही भातखळकर यांनी पत्रात नमूद केलं आहे.
वाचा:
‘सुशांतच्या आत्महत्येचा तपास केंद्र सरकारनं केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडं दिला आहे. राज्य सरकार या चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी आणणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times