कानपूर:उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने डायल ११२ वर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. मंगळवारी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता एक धक्कादायक प्रकार समोर आला. या तरुणाला आपल्या प्रेयसीच्या वडिलांना फसवायचं होतं, म्हणून त्याने थेट योगी आदित्यनाथ यांना धमकी दिली. पण, अखेर त्याचा भांडाफोड झाला.प्रेयसीच्या वडिलांना फसवायचं होतं

कानपूर येथील बाबुपुरवा कोतवाली परिसरातील बेगमपुरवा येथे राहणाऱ्या अमीन उर्फ छोटूचे त्याच वस्तीत राहणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. प्रेयसीच्या वडिलांना या दोघांच्या प्रेमसंबंधाचा संशय होता. पण, प्रेयसीच्या वडिलांना अमीन जराही आवडत नव्हता. त्यामुळे त्यांनी मुलीला अमीनशी भेटण्यास बंदी घातली होती. त्यामुळे चिडलेल्या अमीनने प्रेयसीच्या वडिलांना फसवण्याचा कट आखला.

योगींनी बदला घेण्याचा शब्द दिला, उत्तर प्रदेशचा माफिया भररस्त्यात आडवा केला

प्रेयसीच्या वडिलांचा मोबाईल चोरला

प्रेयसीच्या वडिलांना अडकवण्यासाठी अमीनने दहा दिवसांपूर्वी त्यांचा मोबाईल चोरला होता. त्यानंतर चोरीच्या मोबाईलचे सिम काढून आपल्या मोबाईलमध्ये लावले. मंगळवारी सकाळी त्याने डायल ११२ वर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवेमारण्याची धमकी दिली. यानंतर लखनऊ ते कानपूरपर्यंतचे पोलीस सक्रिय झाले.

३८ प्रवाशांना घेऊन जाणारी शिवशाही कर्नाळा खिंडीत पलटी, एकाचा दुर्दैवी मृत्यू, २५ प्रवासी जखमी
असा पकडला गेला

त्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान अमीनला बेगमपुरवा परिसरातून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने दहा दिवसांपूर्वी हा मोबाईल चोरल्याचे सांगितले. ज्याचा मोबाईल चोरीला गेला त्याला फसवायचे होते, असंही त्याने सांगितलं. याप्रकरणातील आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अडखळत चालत होता, तरीही पोलिसांना संशय, प्लास्टर कापून पाहिलं तर कोट्यवधींचं घबाड सापडलं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here