वाचा:
ईडीच्या बेलार्ड पीयर येथील कार्यालयता रिया आणि तिचा भाऊ शौविकची मॅरेथॉन चौकशी करण्यात आली. आठ तास चाललेल्या या चौकशीनंतर दोघांनाही रात्री उशिरा सोडण्यात आले. या चौकशीचा तपशील हाती आला नसला तरी रियाकडून तपासात सहकार्य केले जात नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता रियाकडून असहकार कायम राहिल्यास ईडीकडून अटकेची कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे. आजच्या चौकशीनंतर रियाला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.
वाचा:
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात पाटणा पोलिसांनी व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लॉन्डरिंग प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. चौकशीच्या पहिल्या फेरीत रियासह तिचा भाऊ शौविक, वडील तसेच सुशांतची पूर्वाश्रमीची मॅनेजर यांचीही चौकशी करण्यात आली. ८ तासांच्या चौकशीनंतर हे सर्वजण ईडी कार्यालयातून बाहेर आले तेव्हा माध्यमांनी मोठी गर्दी केली होती. काहीवेळ तिथे गोंधळही निर्माण झाला. पोलिसांनी या सर्वांना वाट करून दिली.
वाचा:
दरम्यान, जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, ही विनंती घेऊन रियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने रियाचा विनंती मान्य केली नाही. त्यामुळेच ईडीकडून आधीच बजावण्यात आलेल्या समन्सनुसार रियाला ईडीचे कार्यालय शुक्रवारी गाठावे लागले. रिया व इतरांच्या चौकशीनंतर याप्रकरणात आज सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. ईडीकडून त्याला तसे समन्स बजावण्यात आले आहे. दुसरीकडे सीबीआयनेही याप्रकरणी एफआयआर नोंदवून गुरुवारपासूनच तपासाला सुरुवात केली आहे.
केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात
मृत्यूप्रकरणी बिहार पोलिसांनी पाटणा येथे आपल्याविरोधात नोंदवलेला एफआयआर मुंबईत हस्तांतरित करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर स्वत:ला पक्षकार बनविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. केंद्राच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे अवर सचिव सत्यप्रकाश राम त्रिपाठी यांनी ही याचिका दाखल केली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times