छत्रपती संभाजीनगर: किराडपुरा येथील राम मंदिरासमोर झालेल्या दंगलीमध्ये पोलिसांची १४ वाहने जाळली. या प्रकरणी ७९ दंगेखोरांना अटक केल्यानंतर पोलिसांची वाहने जाळणाऱ्यांचा शोध सुरू होता. पोलिसांची वाहने जाळण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या जिन्सी भागामध्ये राहणारे दोघेही दंगलीनंतर दिवसा घरी राहणे टाळत होते. अखेर एटीएसला पोलिसांची वाहने जाळणाऱ्या दोघांना सीसीटीव्ही फुटेच्या माध्यमातून घटनेच्या २० दिवसानंतर अटक करण्यात यश आलं आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सय्यद जुहुर सय्यद मोहीम (वय २४, रा.जिन्सी), सय्यद इलियास सय्यद नाजेर (वय २३, रा.जिन्सी) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले दोघेही आरोपी शहरांमध्ये फळ विक्री करण्याचे काम करतात. दरम्यान, रामनवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुरा येथे दोन गटात किरकोळ वाद झाला. मात्र, त्यानंतर घटनास्थळी मोठा जमावाने दगडफेक करायला सुरुवात केली.

मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा; अस्थिरतेचे सावट दूर करत एकनाथ शिंदेंबद्दल फडणवीस स्पष्टच बोलले!
घटनास्थळी असलेल्या पोलिसांच्या वाहनाला जमावाने टार्गेट केलं, यामध्ये पोलिसांची तब्बल १४ वाहने जाळण्यात आली. जमाव मंदिरावर चालून जाण्याचा प्रयत्न करत होता. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला. जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये पोलीस देखील मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. घटना घडल्यानंतर पोलिसांकडून दंगल घडवणाऱ्यांची धरपकड सुरू होती. यासाठी पोलिसांची अनेक पथक आरोपींचा शोध घेत होती. या प्रकरणी ७९ जणांना पोलिसांनी अटक केली.

दंगलीमध्ये पोलिसांची तब्बल १४ वाहने जाळण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या तरुणांचा पोलीस शोध घेत होते. यादरम्यान पोलिसांना दंगलीच्या दिवशी दोन मित्र दुचाकीवरून ये-जा करताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी अधिक शोध घेतला असता हे दोघेही जुहूर आणि इलियास असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यांचा शोध घेतला असता ते दोघेही दंगलीनंतर दिवसा घरी राहण्यास टाळत होते. अखेर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे .दोघांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

IPL 2023: मुंबई इंडियन्सच्या पराभवातही अर्जुन तेंडुलकरचे कौतुक; करिअरमध्ये प्रथमच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here