नाशिक: नाशिक शहरातील सिडको परिसरात गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा सिडको परिसरात असलेल्या सावता नगर येथे तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादात २४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. परशुराम बाळासाहेब नजान (वय २४) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की ,मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास परशुराम हा सावता नगर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत एक मित्र देखील होता. दरम्यान, त्याच्या मित्राचे आणि संशयीतांचे जुने भांडण होते. जुन्या भांडणाची कुरापत काढून तीन ते चार जणांनी परशुराम आणि त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी परशुराम प्रतिकार करत असताना संशयतांनी हॉटेलच्या बाहेर पडलेल्या पेव्हर ब्लॉक त्याच्या डोक्यात घातला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरु पळून गेले. जखमी अवस्थेत मित्रांनी परशुरामला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

शिवशाही बसला भीषण अपघात: चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटली, १ जागीच ठार, २२ प्रवासी जखमी
पुढील उपचारार्थ परशुरामला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या घटनेची माहिती समजताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

दरम्यान, नाशिकच्या अंबड पोलीस ठाणे हद्दीत मागच्या काही दिवसांपूर्वी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच काल रात्रीच्या सुमारास तरुणाची एका टोळक्याकडून हत्या करण्यात आली. या घटनेनं नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. गोळीबार, हाणामारी आणि हत्या यांसारख्या गंभीर घटना घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये देखील प्रचंड भीतीचे वातावरण पसरलं आहे.

पोलिसांची १४ वाहनं जाळली, CCTVच्या मदतीने दोघांच्या मुसक्या आवळल्या; छ.संभाजीनगर दंगल प्रकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here