नवी दिल्ली :जागतिक बाजारापासून भारतीय वायदा बाजारातही सोन्या आणि स्थिर व्यवहार होताना दिसत आहे. भारतीय फ्युचर्स मार्केटमध्ये मौल्यवान सोन्याच्या किमतीत १०० रुपयांची घसरण झाली तर चांदीच्या दरात तेजीने व्यवहार होत असून भावात उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत चांदीचा भाव पुन्हा एकदा ७४ हजार रुपयांच्या पुढे पोहोचला असून एक दिवसापूर्वी दरात १००० रुपयांची मोठी घट होऊन भाव ७३ हजार रुपये प्रति किलोवर घसरला होता. त्यामुळे आज खरेदीपूर्वी सोन्या आणि चांदीचा नवीन भाव काय आहे ते जाणून घ्या.

सोन्याच्या दरात किंचित घट

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतीत नाममात्र घसरण होऊन सकाळी १० वाजता सोन्याचा भाव ९१ रुपयांनी घसरून ६०,१६७ रुपयांवर व्यवहार करत होते. तर एक तासाच्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव ६० हजार १२२ रुपयांवर पोहोचला. एका दिवसापूर्वी सोन्याचा भाव ६०,२१६ रुपयांवर बंद झाला होता, जो आज ५१ रुपये घसरून ६०,२१० रुपयांवर उघडला. दरम्यान तज्ज्ञांच्या मते सोन्याने गुंतवणुकीवर एका वर्षात सुमारे २०% परतावा दिला आहे. दरम्यान, फ्युचर्स मार्केटच्या विपरीत किरकोळ बाजारात सोन्याचे भाव वाढले असून आज तुमच्यासाठी खरेदी महाग ठरेल. तुमच्या शहरातील सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत…

मुकेश अंबानींकडून ‘राईट हँड’ला खास गिफ्ट; तब्बल १५०० कोटींची बिल्डिंग भेट; कारण काय?
देशातील मेट्रो शहरांतील सोन्याचे भाव

  • दिल्लीत २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ११० रुपये वाढीसह ६१,५३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
  • मुंबईत २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ११० रुपयांच्या वाढीसह ६१,०४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
  • चेन्नईमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढून ६१,५३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
  • कोलकात्यात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढून ६१,०४० रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे.

भारतीय श्रीमंतांच्या अडचणी वाढल्या, परदेशात ठेवलेल्या पैशांनी वाढवली डोकेदुखी; वाचा सविस्तर
चांदीच्या दरात किंचित वाढ
दुसरीकडे, चांदीच्या दरात किंचित वाढीसह व्यवहार होत आहे. MCX वर सकाळी १० वाजता चांदीचा दर ४० रुपये घसरून ७४,२६० रुपयांवर व्यवहार करत आहे. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान चांदीचा भाव ७४,2५० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. विशेष म्हणजे एका दिवसापूर्वी चांदीचा भाव ७४,२६३ रुपयांवर बंद झाला होता, जो आज तेजीसह ७४,३४० रुपयांवर उघडला.

लाखोंचे दागिने असलेली सराफाची स्कुटीच पळवली ; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

आंतरराष्ट्रीय बाजारात सोना-चांदी
जागतिक बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या किंमतीत सपाट व्यवहार होत आहे. सोन्याचे वायदे प्रति औंस $२,००५.२० वर सपाटपणे व्यवहार करत असून सोन्याचा भाव प्रति औंस $२.७१ ने किंचित घसरून $१,९९४.६८ प्रति औंस वर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीची स्पॉट किंमत २४.९६ डॉलर प्रति औंस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here