नवी दिल्ली :म्युच्युअल फंडाशिवाय मालमत्ता खरेदी देखील गुंतवणुकीचा एक फायदेशीर पर्याय आहे. मात्र, मालमत्ता (प्रॉपर्टी) खरेदी केल्यावर त्याची कागदपत्रे हरवली किंवा गहाळ झाली, तर मालमत्ता विकण्यात खूप अडचणी येतात. तुमच्या मालमत्तेची कागदपत्रे खूप महत्त्वाची असतात कारण ते दर्शवतात की तुम्ही या प्रॉपर्टीचे मालक असून त्यावर तुमचा कायदेशीर अधिकार आहे.

मालमत्तेच्या बाबतीत प्रत्येकजण खूप सावध असतो. मात्र असे असूनही काही वेळा काही समस्या निर्माण होतात. मालमत्तेची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी लोक बँक लॉकरचाही वापर करतात. ही कागदपत्रे देखील आवश्यक असतात कारण त्याशिवाय तुम्ही भविष्यात तुमची मालमत्ता विकू शकणार नाही. ही कागदपत्रे फक्त तुम्हीच या मालमत्तेचे खरे मालक आहात आणि त्यावर तुमचा कायदेशीर अधिकार आहे हे दर्शवतात. पण जर तुमच्या मालमत्तेची कागदपत्रे हरवली किंवा कुठेतरी ठेवून विसरलात तर तुम्ही काय केले पाहिजे याबाबत सविस्तर सांगणार आहोत.

Sale Deed म्हणजे काय? मालमत्ता विकण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
जर तुम्ही तुमच्या मालमत्तेची कागदपत्रे हावरली किंवा गहाळ झाली तर दुसरी व्यक्ती त्याचा गैरफायदा गेट तुमच्या मालमत्तेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा स्थितीत मालमत्तेची कागदपत्रे कोणत्याही कारणाने हरवली तर काय करावे? तुमच्या मालमत्तेची कागदपत्रे कुठेतरी हरवली असतील तर काळजी करण्याची गरज नाही.

प्रथम एफआयआर दाखल करा
असे काही तुमच्याबरोबर झाल्यास तुम्ही सर्वप्रथम तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन FIR नोंदवावा. तुमच्या मालमत्तेची कागदपत्रे हरवले आहेत हे सांगा किंवा तुम्ही कुठेतरी ठेवून विसरलाय जे आता सापडणार नाही अशी नोंद करा. FIR दाखल केल्यानंतर त्याची एक प्रतही स्वतःकडे नक्की ठेवा आणि शक्य असल्यास, ही माहिती नोंदणी महानिरीक्षक किंवा उपनिबंधक यांना लेखी स्वरूपात देखील देण्याचा प्रयत्न करा. या लेखी माहितीमध्ये ही परिस्थिती कशी निर्माण झाली हे नक्की सांगा, जेणेकरून त्यांना समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजेल. याशिवाय वर्तमानपत्रात नोटीसही प्रसिद्ध करा.

मृत्युपत्राविना निधन झाल्यास कसं होतं संपत्तीचं वाटप होते? मुलांशिवाय यांचाही संपत्तीवर अधिकार
कायदेशीर मार्गाचा अवलंब करा…
मालमत्तेच्या कागदासाठी स्टॅम्प पेपरवर एक हमीपत्र काढा, ज्यामध्ये मालमत्तेची संपूर्ण माहिती लिहिली असेल. यामध्ये हरवलेली कागदपत्रे, FIR आणि वृत्तपत्रातील नोटिशीचा उल्लेख असला पाहिजे. हे हमीपत्र नोटरीकडे नोंदणीकृत असणे आवश्यक असून त्यानंतर ते निबंधक कार्यालयात जमा केले पाहिजे. तुम्ही हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत असल्यास तुम्ही रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन किंवा RWA कडून डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट मिळवू शकता.

तुमच्या प्रॉपर्टीवर कोणी बेकायदेशीर ताबा मिळवलाय का? जाणून घ्या काय सांगतो कायदा, लगेच मिळेल न्याय
मालमत्तेची डुप्लिकेट कागदपत्रे
आता तुमच्या मालमत्तेच्या डुप्लिकेट पेपरसाठी तुम्हाला रजिस्ट्रार ऑफिसमध्ये डुप्लिकेट विक्री डीडसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला FIRची प्रत, वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीची प्रत, डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट आणि नोटरीने प्रमाणित केलेले हमीपत्र तसेच काही प्रक्रिया शुल्क निबंधक कार्यालयात जमा करावे लागेल. त्यानंतर तुमच्या नावावर डुप्लिकेट विक्री डीड जारी केला जाईल.

प्रॉपर्टीसाठी आईचा खून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here