नवी दिल्ली :जोवर आपल्याकडे नोकरी असते तोपर्यंत आपला खिसा भरलेला असतो आणि सर्व कामे सुरळीत होतात. पण जेव्हा वयानुसार जेव्हा तुमची कमाई बंद होते तेव्हा काय? तुम्हाला लहान-सहान गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार का? असे प्रश्न तुमच्याही मनात कधी आले तर अस्वस्थ होऊ नका. आत्तापासूनच निवृत्तीचे नियोजन सुरू करा आणि यासाठी तुम्ही अशा काही योजनांमध्ये गुंतवणूक करावी, ज्यातून तुम्हाला वृद्धापकाळात नियमित उत्पन्न मिळेल.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (LIC) प्रत्येक वर्ग आणि वयासाठी पॉलिसी आहेत. यामध्ये अशा अनेक पॉलिसी आहेत, ज्या गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. अशीच एक पॉलिसी म्हणजे LICची जीवन अक्षय पॉलिसी, ज्यामध्ये एकरकमी गुंतवणूक केल्यानंतर तुमचे दर महिन्याला नियमित उत्पन्न सुरू होईल. विशेष म्हणजे निवृत्ती नियोजनाच्या दृष्टीने हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Tax Saving Tips: नोकरदारांना इनकम टॅक्स वाचवण्यासाठी रामबाण उपाय, लगेच करून पाहा
एलआयसी जीवन अक्षय पॉलिसीची वयोमर्यादा
एलआयसी जीवन अक्षय पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळू शकतो. पेन्शनचे निकष तुम्ही केलेल्या गुंतवणुकीनुसार अवलंबून असतील. पेन्शन रकमेची गणना तुमच्या गुंतवणुकीनुसार केली जाते. ही पॉलिसी सिंगल प्रीमियम नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपटिंग आणि वैयक्तिक वार्षिकी योजना आहे. म्हणजेच, एकदा पैसे जमा केले की आयुष्यभरासाठी तुमचे उत्पन्न निश्चित होते. यासाठी गुंतवणूकदारांसाठी वयोमर्यादा ३० ते ८५ वर्षे आहे.

पेन्शन मिळवण्यासाठी १० पर्याय
या पॉलिसीमध्ये दरमहा पेन्शन मिळविण्यासाठी १० पर्याय उपलब्ध आहेत. एलआयसीची ही पॉलिसी सिंगल किंवा जॉइंट फॉर्ममध्ये खरेदी करण्याची सुविधा देखील उपलब्ध असून पॉलिसी जारी केल्याच्या तीन महिन्यांनंतर तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळते. तसेच तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीद्वारे मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक आधारावर पेन्शन मिळू शकते. विशेष म्हणजे तुम्ही कोणताही पर्याय निवडाल तर तुम्हाला वेगवेगळे फायदे मिळतात.

तुम्हाला करोडपती व्हायचं आहे का?, मग ही युक्ती समजून घ्या, रोज वाचवा फक्त ५० रुपये
किमान गुंतवणूक मर्यादा काय?
एलआयसी जीवन अक्षय पॉलिसीमध्ये किमान १ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते. मात्र, यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. म्हणजे गुंतवणूक जितकी जास्त तितकी मासिक पेन्शन जास्त मिळेल. पॉलिसीचे पर्याय पाहता, त्यात १ लाख गुंतवून तुम्हाला १२,००० रुपयांपर्यंत वार्षिक पेन्शन मिळू शकते. तर तुम्हाला दरमहिना २० हजार रुपये आणि वार्षिक २.४० लाख रुपये पेन्शन हवे असल्यास ४० लाख ७२ हजार रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.

दरम्यान, एलआयसी जीवन अक्षय पॉलिसीची वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितकी तुम्हाला पेन्शन मिळेल. उदाहरणार्थ, जर ४५ वर्षीय व्यक्तीने पॉलिसीमध्ये ७० लाख रुपयांच्या विमा रकमेचा पर्याय निवडला, तर त्याला ७१,२६,००० रुपये एकरकमी प्रीमियम भरावा लागेल. आणि या गुंतवणुकीतून त्यांना दरमहा ३६,४२९ रुपये पेन्शन मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here