आयटीसीचा शेअर्स ४१२ रुपयांवर पोहोचला असून गेल्या एका वर्षात आयटीसीच्या शेअरमध्ये ६१ टक्के वाढ झाली, तर गेल्या तीन वर्षांत १२९% परतावा दिला आहे. आयटीसीने इन्फोसिसच्या मार्केट कॅपला मागे टाकत देशातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत सहावे स्थान पटकावले आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. याशिवाय चालू महिन्यात ITC स्टॉकने एक किंवा दोनदा नव्हे तर अनेक वेळा नवीन सर्वकालीन उच्चांक नोंदवला आहे. तसेच काल पुन्हा असेच झाले NSE म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजरावर रु. ४१३.५५ आणि BSE वर ४१३.४५ रुपयाचा नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला.
तज्ञांचे म्हणणे आहे की नजीकच्या काळात आयटीसी एचयूएलला मागे टाकेल. मार्च तिमाहीत कंपनीची सिगारेट विक्री वाढ दुहेरी अंकात राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एचयूएलला अनेक स्टार्टअप्स आणि रिलायन्स रिटेल सारख्या मोठ्या कंपन्यांकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. दिवसाच्या व्यवहारात आयटीसीच्या शेअर्सने ४१३ रुपयांचा उच्चांक गाठला होता. गेल्या पाच दिवसात, आयटीसीच्या शेअर्समध्ये १० रुपयांची वाढ झाली आहे. आयटीसीचा शेअर्स २७ मार्चला ३८० रुपयांच्या पातळीवर होते. एका महिन्यात शेअर्सने गुंतवणूकदारांना ९ टक्क्यापेक्षा जास्त परतावा दिला आहे.
आयटीसीचा शेअर्स २३ डिसेंबर २०२२ ला ३२६ च्या पातळीवर होते. तिथून आतापर्यंत गुंतवणूकदारांना 85 रुपयांचा परतावा मिळाला आहे. केवळ ६ महिन्यांत आयटीसीने गुंतवणूकदारांना २७ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला असून गेल्या एक वर्षात आयटीसीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना ६१ टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या तीन वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करून १२९ टक्के परतावा दिला आहे.
गुंतवणूक करताय… हे लक्षात घ्या!