तु मला खूप आवडतेस, तू खूप सुंदर दिसतेस, असं म्हणत शरीर सुखाची मागणी केली. महिलेने त्याला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तो अंगाशी लगट करू लागला. यावेळी महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने तिचं तोंड दाबलं आणि तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर त्याने तिला धमकी दिली. याविषयी कोणाला सांगितलं, तर तुला कधी कसा मारेल हे कोणाला समजणारही नाही? असं पीडितेला म्हणत त्या ठिकाणाहून नराधमाने पळ काढला.
घडलेली सर्व घटना पीडित महिलेने घरच्यांना सांगितली. मात्र, गावगुंड असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी किंवा पोलीस तक्रार करण्यासाठी घरातल्यांनी तब्बल काही तास लावले. अखेर धारूर पोलीस ठाणे गाठून घडलेली आपबीती महिलेने पोलिसांना सांगितली. महिलेच्या तक्रारीवरून या नराधमाच्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
धारूर तालुक्यातच २४ तासांत बलात्काराचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे स्त्री सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात छेडछाड बलात्कार अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अशा एक ना अनेक घटना घडत आहेत. यावर कुठेतरी अंकुश बसावा यासाठी या बलात्काऱ्यांवर तात्काळ कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी जनसामान्यातून पुढे येत आहे.