सांगली: सख्या भावाकडून भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीच्या कुपवाड येथे घडली आहे. डॉक्टर भावाची लहान भावाने खुरप्याने हल्ला करून ही हत्या केली आहे. या घटनेमुळे कुपवाड शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी संशयित भावाला ताब्यात घेतला आहे.

कुपवाड शहरातल्या जुना मिरज रोडवरील संत रोहिदास मंदिर येथे डॉक्टर अनिल बाबाजी शिंदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. डॉक्टर शिंदे यांचा लहान भाऊ संपत बाबाजी शिंदे यानेच खुरप्याने वार करून ही हत्या केली आहे. सकाळच्या सुमारास डॉक्टर अनिल बाबाजी शिंदे हे घरामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन करत बसले होते. यावेळी अचानकपणे संपत हातात खुरपे घेऊन घरात दाखल झाला. त्याने पाठीमागून खुरप्याने वार करत भावाची हत्या केली.

अजितदादांसाठी चंद्रकांत पाटील आले धावत पळत अन् म्हणाले, आता ते कुठे गायब झाले?
यावेळी त्याने शिवीगाळ करत मोठा भाऊ असणाऱ्या अनिल शिंदे यांच्यावर एकामागून एक वार केले. तर त्या ठिकाणी असणाऱ्या अनिल शिंदे यांच्या पत्नी यांनी आपल्या मुलांना घेऊन बाहेर धाव घेतली. त्यानंतर आसपासच्या नागरिकांनी घरात धाव घेतली. मात्र, तत्पूर्वीच अनिल शिंदे हे जागीच ठार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी धाव घेऊन संशयित संपत शिंदे याला ताब्यात घेतलं आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे कुपवाड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी: शरद पवारांची सूचना अन् सामंतांकडून ऑन द स्पॉट निर्णय; बारसूतील संघर्ष थांबणार का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here