परभणी :काम केल्यानंतर आलेले पैसे घरी न देता मित्रांसोबत दारू पिऊन उडवत असल्याचा राग मनात धरून मुलाने जन्मदात्या पित्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना परभणीच्या मानवत तालुक्यातील तारबोरगाव येथे घडली आहे.दत्तात्रय देविदास भोकरे (वय ५८ वर्षे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यामध्ये आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास मानवत पोलीस करत आहेत.

परभणीच्या मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथील दत्तात्रय देविदास भोकरे (वय ५८ वर्षे) काम केल्यानंतर त्यातून मिळालेले पैसे घर खर्चासाठी न देता मित्रांसोबत दारूची पार्टी करून उडवत होते. वारंवार सांगून देखील दत्तात्रय भोकरे घर पैशासाठी खर्च देत नसल्याने या गोष्टीचा राग मनामध्ये धरून मुलगा परमेश्वर दत्तात्रय भोकरे (वय २८ वर्ष) याने ताडबोरगाव येथील सूर्यभान काजळे यांच्या शेतामध्ये वडील दत्तात्रय भोकरे यांच्या मानेवर आणि खांद्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली.

विदर्भातील दर्दी आवाजाचा गायक रडवून गेला! वीज कोसळून चौकोनी कुटुंबाचा दुःखद अंत
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. यासोबतच पोलीस अधीक्षक आर रागसुधा उपविभागीय पोलीस अधिकारी गोफाने, मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. बाबासाहेब दत्तात्रय भोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी परमेश्वर दत्तात्रय भोकरे यांच्या विरोधात मानवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विम्याचे एक कोटी मिळविण्यासाठी चक्क पत्नीनेच करवून घेतला पतीचा खून

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा अधिक तपास मानवत पोलीस करत आहेत. वडील घर खर्चासाठी पैसे देत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याची हत्या केली असल्याने या घटनेमुळे परभणीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर ताड बोरगाव येथे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वीस वर्षांचं सहजीवन, पण दुसऱ्या बायकोची एक गोष्ट डोक्यात गेली, पतीने भररस्त्यात संपवलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here