पुणे: एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या इमारतीच्या पार्किंदमध्ये जाऊन दुचाकीसह तीन दुचाकी पेटवल्याची धक्कादायक घटना लोहगाव भागात घडली आहे. या प्रकरणी एका युवकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी युवकाच्या साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील लोहगावमधील तरुणीच्या वडिलांनी विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रीराम घाडगे (रा. वाघोली, पुणे) आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खांदवेनगर येथे सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

वेळ पडली तर अख्खी शिवसेना बारसूमध्ये आणतो, उद्धव ठाकरेंचा राऊतांकरवी बारसूवासियांना निरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी आणि आरोपी श्रीराम घाडगे हे विमाननगर परिसरात एका कॉलेजमध्ये शिकत आहे. श्रीराम याने तरुणीला एकतर्फी प्रेमातून “माझ्यासोबर बोलत जा”, असं म्हणून तिला सतत त्रास देत होता. तिने ही गोष्ट तिच्या वडिलांना सांगितली. तेव्हा त्यांनी आरोपी श्रीराम घाडगे याला “तिला तुझ्यासोबत बोलायचे नाही. उगाच त्रास देऊ नकोठ”, असं सांगितलं.

तरुणाने त्याचा राग मनात धरुन एका साथीदाराला सोबत घेतलं. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तक्रारदार यांच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीला थेट आग लावली. त्यात त्यांच्या शेजारी असलेल्या आणखी दोन दुचाकींनाही आग लागून त्यांचे नुकसान झालं आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार एस धेंडे पुढील तपास करत आहेत.

अजितदादांसाठी चंद्रकांत पाटील आले धावत पळत अन् म्हणाले, आता ते कुठे गायब झाले?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here