नागपूर : नागपूर जिल्ह्यात यंदा एप्रिल महिन्यात वारंवार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतीसोबतच फळबागेचंही नुकसान झालं असून, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. मंगळवारी सायंकाळी नागपुरातही जोरदार पाऊस झाला. या पावसात गारा पडल्या. हिंगणा तालुक्यात अतिवृष्टी आणि गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. येरणगाव दाभा गावात गारपिटीमुळे १२ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला.

रोशन निंबाळकर यांचा गावात पोल्ट्री फार्म आहे. त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये हजारो कोंबड्या होत्या. मंगळवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पाऊस सुरू झाला. पावसाळ्यात काही कोंबड्या त्यांच्या शेडमध्ये होत्या, तर काही बाहेर होत्या. मात्र पावसासोबतच झालेल्या गारपिटीमुळे १२ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर पोल्ट्री फार्म मालकाने सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

हृदय ठाण्याला; फुफ्फुस दिल्लीला, मृत्यूनंतरही तो पाच जणांमध्ये जिवंत, तरुणामुळं मिळाले जीवदान
गुरुवारी नागपूरसह संपूर्ण जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. शहरातील सदरच्या जेपी टाऊनची सुरक्षा भिंत कोसळल्याने मायलेकाचा मृत्यू झाला, तर जोरदार वाऱ्यामुळे घराचं छत कोसळल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला. आजपासून पुढील पाच ते सात दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

फिल्मला रेटिंग द्या अन् लाखो कमवा! असा कॉल आला तर सावधान; नागपूरात २० लाखांची फसवणूक
गेल्या आठवडाभरापासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. दिवसभर कडक ऊन, काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर सायंकाळी काही ठिकाणी गारपीट झाली. वाढत्या तापमानामुळे पारा चढत असल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे. काहींचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. माणूस स्वतःला व्यक्त करू शकतो. तो बोलू शकतो, मात्र प्राणी-पक्षी बोलू शकत नाहीत. त्यामुळे अशा विचित्र परिस्थितीत त्यांचा मृत्यू होऊ शकतो. अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतीनं थकवलं म्हणून कुक्कुटपालन केलं, पण अवकाळीमुळे क्षणात सारं उद्ध्वस्त झालं

मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन करणारे म्हणजेच पोल्ट्री व्यावसायिक घाबरले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पक्षकारांच्या मृत्यूचं प्रमाण अचानक वाढलं आहे. अशा स्थितीत पोल्ट्री व्यवसायावर संकट येण्याची दाट शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here