अहमदनगर: ‘ आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचा बिहार निवडणुकीशी अजिबात संबंध नाही. मुख्यमंत्री म्हणून बिहारच्या सुपुत्राबद्दल जी भूमिका घ्यायला हवी, तीच भूमिका नितीश कुमारांनी घेतली आहे. इतर मुख्यमंत्र्यांनीही हेच केले असते. आपल्या राज्यातील एखाद्या भूमिपुत्रासोबत अशी दुर्घटना झाली असती तर उद्धव ठाकरेंनीही नितीश कुमारांसारखीच भूमिका घेतली असती,’ असं मत भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार यांनी काल नगरमध्ये बोलताना सुशांत सिंह प्रकरणावरून भाजपच्या नेत्यांवर तोफ डागली होती. ‘भाजपचा सोशल मीडिया सक्षम आहे. या मीडियावर एखादा ट्रेंड चालवणे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जमते. भाजपचे नेते शब्दात खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. आज सुशांतसिंह राजपूत प्रकरणात तेच चालू आहे,’ अशी बोचरी टीकाही पवार यांनी केली होती. पवार यांच्या वक्तव्याचा खासदार विखे यांनी आज चांगलाच समाचार घेतला. ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीनंतर बोलत होते.

वाचा:

‘सुशांतसिंह प्रकरणाची सीबीआय चौकशी लागली आहे. कालच संबंधित अभिनेत्रीची आठ तास चौकशी झाली आहे. या प्रकरणातील सत्य निश्चित जनतेसमोर येईल. आमचा सरकारवर आक्षेप नाही, पोलिसांवर आक्षेप नाही. आमचे तर केवळ एवढेच मत आहे की सत्य बाहेर आले पाहिजे. ‘आम्ही या प्रकरणाचे राजकारण करीत नाही. सीबीआय चौकशी चालू आहे. सीबीआय राजकारण करतेय असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मुळात सीबीआय स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यामुळे पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडावी. त्यांचा सीबीआयवर विश्वास आहे का? सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे का ? हेही त्यांनी स्पष्ट करावे,’ असं विखे म्हणाले.

राष्ट्रवादीवाले तर ट्रॅक्टर चालवतानाचे फोटोही टाकतात!

‘सोशल मीडियाचा वापर हा फक्त भाजपच करत नाही, सर्वच पक्षाचे लोक करतात. महाविकास आघाडीचे आमदार, मंत्री हे या माध्यमातून वेगळा अजेंडा राबवतात. जी कामे झाले नाहीत, ती पण झाली असे दाखवतात. एवढेच काय, राष्ट्रवादीचे आमदार ट्रॅक्टर चालवतानाचे, एखाद्या हॉस्पिटल बाहेर औषध फवारणी केल्याचे, उद्घाटन केल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत असतात,’ असा पलटवार करीत खासदार डॉ. पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

वाचा:

‘महाविकास आघाडीचे आमदार, मंत्री भूमिपूजनाचे फोटो टाकतात. आता भूमिपूजने करून ती कामे करण्यासाठी सरकारकडे निधी आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुळात भाजपच्या लोकांनी केलेल्या कामाची उद्घाटनं आता होऊ लागली आहेत. हीच कामे दाखवून त्याचे श्रेय ते घेत आहेत. आता आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आमच्या काही भावना जनतेकडे पोहोचण्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा वापर करणारच,’ असेही ते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here